आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरोग्य तपासणी‎:अग्रसेन भवनातील शिबिरात 75 जणांची आरोग्य तपासणी‎

नाशिक‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अग्रवाल सभेच्या पुढाकाराने जिल्हा ‎ महिला मंडळ व अग्रवाल सभा‎ आरोग्य उपसमितीच्या माध्यमातून ‎ अग्रसेन भवन, काठे गल्ली येथे‎ आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात‎ पार पडले. शिबिरात ७५ नागरिकांची ‎ आराेग्य तपासणी करण्यात आली.‎ अग्रवाल सभेच्या माध्यमातून‎ नाशिक जिल्हा अग्रवाल महिला‎ मंडळ व अग्रवाल सभा आरोग्य‎ उपसमिती यांच्या समितीने शिबिर‎ पार पडले. या ठिकाणी कॅन्सर‎ तपासणी, नेत्र तपासणी, दंत‎ तपासणी, रक्तदाब, मधुमेह‎‎ तपासणी करण्यात आली. यावेळी‎ महिलांचे पेप्समिअर तपासण्याही‎ करण्यात आल्या.

त्या माध्यमातून‎ कॅन्सरची स्थिती नागरिकांनी जाणून‎ घेतली. अधिक तपासणीसाठी‎ रुग्णालयात जाण्याचा सल्ला‎ यावेळी लोकांना देण्यात आला.‎ यावेळी ६० लोकांनी कर्करोगाची तर‎ १० महिलांंनी पेप्समिअर तपासणी‎ करून घेतली. कॅन्सर तपासणीकामी‎ मानवता क्यूरी रुग्णालयाच्या मंजूषा‎ पाटील, डॉ. नूर शेख, शीतल‎ पाटील, संगीता जाधव यांनी परिश्रम‎ घेतले. डॉ. कल्याणी अग्रवाल यांनी‎ सर्वसाधारण रुग्णांची तपासणी‎ करून त्याना उपचार सांगितले.

तर‎ दंतचिकित्सेसाठी डॉ. आदर्श‎ अग्रवाल तसेच अरिहंत डेंटलच्या‎ डॉ. दीपश्री राठोड त्यांनी तपासणी‎ केली तर नेत्र तपासणीसाठी‎ सोनवणे आय हॉस्पिटलचे‎ डॉ.अतुल सोनवणे यांनी नेत्र‎ चिकित्सा केली.‎ नेत्रदानासाठी सक्षम संस्थेचे अनिल‎ खांडेकर व अनंत नारखेडे यांनी‎ नागरिकांशी संवाद साधून २१‎ जणांकडून नेत्रदानाचा संकल्प‎ निश्चित केला.‎

बातम्या आणखी आहेत...