आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सायकल दिन:‘सायक्लोथॉन’मधून आरोग्य संवर्धनाचा संदेश ; सायकलिस्ट‌ फाउंडेशन, मानवता कॅन्सर सेंटर, स्मार्ट सिटी डेव्हलपमेंटचे आयोजन

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जागतिक सायकल दिवसाचे औचित्य साधत नाशिक सायकलिस्ट फाउंडेशन, मानवता कॅन्सर सेंटर व स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या वतीने सायक्लोथॉनचे आयोजन करण्यात आले हाेते. “स्वच्छ व सुंदर नाशिक आपली जबाबदारी” “तंबाखू सोडा, सायकल चालवा”, “तंबाखू सोडा, आरोग्य वाढवा’ या घोषणा देत रॅलीद्वारे जनजागृती करण्यात आली. आरोग्य व पर्यावरण संवर्धनासाठी सायकलचा वापर करावा तसेच ३१ मे हा जागतिक तंबाखूविरोधी दिन म्हणून साजरा केला जातो, त्या अनुषंगाने तंबाखू सेवन हानिकारक आहे याबद्दल जनजागृती करण्यासाठी सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले. स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुमंत मोरे, डॉ. राज नगरकर, राजेंद्र वानखेडे, चंद्रकांत नाईक, किशोर माने यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून रॅलीस प्रारंभ झाला. सायकल रॅलीचा जुना गंगापूरनाका-मुंबईनाकामार्गे मानवता कॅन्सर सेंटर येथे समारोप करण्यात आला. सर्वांच्या सायकलला तंबाखूविरोधी संदेश देणारे बोर्ड लावण्यात आले होते. राइडची सांगता मानवता कॅन्सर सेंटर येथे झाली. आकर्षक सायकल सजावटमध्ये प्रियंका देशमुख, प्रवीण खोडे,योगिता बारसे यांना विजयी घोषित केले. अनिरुद्ध शेंडे, मीताली पाटील, मंजूषा पाटील यांनी परिश्रम घेतले. स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट डेप्युटी जनरल मॅनेजर सुधीर गोराडे, अर्बन प्लॅनर माधुरी जावळे, एक्झिक्युटिव्ह असिस्टंट नीलेश बर्डे व टीमचे सहकार्य लाभले. रॅलीमध्ये १७० सायकलिस्टने सहभाग नोंदवला. सहभागी सायकलिस्टला सर्टिफिकेट व कॅप देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.

बातम्या आणखी आहेत...