आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हरकत:आरोग्य विज्ञान विद्यापीठ प्राधिकरण निवडणूक; प्राथमिक मतदार याद्या जाहीर

नाशिक25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे विविध प्राधिकरण व अभ्यास मंडळावरील सदस्य निवडीकरिता निवडणुकीच्या अनुषंगाने प्राथमिक मतदार याद्या विद्यापीठाच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आल्या आहेत. विद्यापीठाकडून प्रसिद्ध प्राथमिक मतदार यादीतील हरकती असल्यास मंगळवारी (दि. ३)सायंकाळी पाच वाजेपर्यंत विद्यापीठाकडे इ-मेलद्वारा अथवा विद्यापीठाचे मुंबई, पुणे, औरंगाबाद, नागपूर, कोल्हापूर व लातूर येथील विभागीय केंद्रात लेखी स्वरूपात पुराव्याचे कागदपत्रांसह नोंदवू शकतात.

विद्यापीठाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा कुलसचिव डॉ. राजेंद्र बंगाळ यांनी सांगितले की, विद्यापीठ अधिनियमात निर्देशित केल्यानुसार विद्यापीठ अधिसभा, विद्यापरिषद व अभ्यास मंडळावरील सदस्य यांच्या निवडीकरिता प्रत्येक पाच वर्षांनंतर निवडणूक प्रक्रिया राबविण्यात येते. त्याद्वारा विद्यापीठाच्या संलग्नित महाविद्यालयातील मान्यताप्राप्त शिक्षकांतून विद्यापीठ प्राधिकरण सदस्यांची निवडणूक प्रक्रियेद्वारे निवड करण्यात येते. यासाठी निवडणूक प्रक्रियेच्या अनुषंगाने प्राथमिक मतदार याद्या तयार करण्यात आल्या आहेत. सदर मतदार याद्या विद्यापीठाचे www.muhs.ac.in संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आल्या असल्याचे त्यांनी सांगितले.

हरकतींसाठी आज शेवटची मुदत विद्यापीठाकडून प्रसिद्ध प्राथमिक मतदार यादीतील हरकती असल्यास तीन जानेवारीपर्यंत सायंकाळी पाच वाजेपर्यंत विद्यापीठाकडे इ-मेलद्वारा अथवा विद्यापीठाच्या मुंबई, पुणे, औरंगाबाद, नागपूर, कोल्हापूर व लातूर येथील विभागीय केंद्रात लेखी स्वरूपात पुराव्याच्या कागदपत्रांसह नोंदवू शकतात. विहित वेळेत प्राप्त हरकतींवर कुलगुरू यांच्या समक्ष सुनावणी घेण्यात येईल. सुनावणीचा निर्णय विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. निवडणूक प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी विद्यापीठ निवडणूक कक्षास ०२५३-२५३९१५१ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.

बातम्या आणखी आहेत...