आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निकाल:आरोग्य विद्यापीठ शिक्षकेतर भरती निकाल

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या आस्थापनेवर रिक्त शिक्षकेतर पदांकरिता नुकत्याच घेण्यात आलेल्या लेखी परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. तो विद्यापीठाचे अधिकृत संकेतस्थळ www.muhs.ac.in वर सर्वांना पाहता येणार आहे. या परीक्षेस प्रविष्ट उमेदवारांना गुण पडताळणी करण्यासाठी सात दिवसांचा कालावधी देण्यात आलेला आहे. तद्नंतर पदनिहाय व संवर्गनिहाय गुणवत्ता यादी तयार करण्यात येईल. तर निकालासंदर्भात खोटा संदेश व अफवांवर विश्वास ठेऊ नये असे विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक डाॅ. संदीप कडू यांनी सूचित केले आहे.

रिक्त शिक्षकेतर पदांकरिता दि. १४ ते १८ ऑक्टोबर २०२२ कालावधीत लेखी परीक्षा घेण्यात आली होती. राज्यातील एकूण २८ परीक्ष केंद्रांवर एकूण १४ हजार ८० उमेदवारांनी लेखी परीक्षा दिली आहे. यामध्ये कक्ष अधिकारी, कक्ष अधिकारी (खरेदी), अधीक्षक, वरिष्ठ लिपिक कम डेटा एंट्री ऑपरेटर, वरिष्ठ सहायक, लिपिक कम टंकलेखक, डेटा एंट्री ऑपरेटर, निम्मश्रेणी व उच्चश्रेणी लघुलेखक, लघुटंकलेखक, रोखपाल, भांडारपाल, सहायक लेखापाल, वीजतंत्री, छायाचित्रकार, आर्टिस्ट कम ऑडिओ अॅण्ड व्हिडिओ एक्स्पर्ट, सांख्यिकी सहायक, वाहन चालक, शिपाई आदी संवर्गासाठी परीक्षा घेण्यात आली होती.

बातम्या आणखी आहेत...