आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Nashik
  • Health University Session Examination In Two Phases; University Summer Exam Schedule Announced On The University's Website |marathi News

परीक्षा वेळापत्रक:आरोग्य विद्यापीठाच्या सत्र परीक्षा दोन टप्प्यांत; विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षांचे वेळापत्रक विद्यापीठाच्या संकेतस्थळावर जाहीर

नाशिक10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या उन्हाळी सत्र २०२२ परीक्षा गुरुवारपासून ( १९ मे) सुरू होणार आहेत. या परीक्षा दोन टप्प्यात घेतल्या जाणार असून पहिला टप्पा हा पदव्युत्तर वैद्यकीय विद्या शाखांच्या पदवी व पदविका अभ्यासक्रमाचा आहे. विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षांचे वेळापत्रक विद्यापीठाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर करण्यात आले आहे.

राज्यातील विविध परीक्षा केंद्रांवर उन्हाळी सत्र २०२२ परीक्षेसाठी एकूण २२०० विद्यार्थी प्रविष्ट होणार आहे. दुसरा टप्पा हा पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रम वगळता उर्वरित सर्व पदव्युत्तर आरोग्य विज्ञान विद्याशाखेच्या वैद्यकीय, दंत, आयुर्वेदिक, युनानी, होमिओपॅथी, भौतिकोपचार, व्यवसायोपचार, भाषा श्रवणदोष, कृत्रिम अवयव विज्ञान, परिचर्या व सर्व आरोग्य विज्ञान विद्याशाखेच्या पदवीच्या सर्व वर्षांच्या लेखी परीक्षा १ जुलैपासून सुरू होणार असून त्या ३१ ऑगस्टपर्यंत सुरू राहतील. या परीक्षेसाठी एकूण ४५ हजार विद्यार्थी प्रविष्ट होणार असल्याची माहिती परीक्षा नियंत्रक डॉ. अजित पाठक यांनी दिली.

विद्यापीठाच्या परीक्षेविषयी अधिक माहिती विद्यापीठाचे अधिकृत संकेतस्थळ www.muhs.ac.in वर माहिती प्रसिद्ध करण्यात आली. हिवाळी सत्राच्या परीक्षांचा लवकरच निकाल: विद्यापीठाच्या हिवाळी सत्र २०२१ परीक्षेचे निकाल १४ दिवसांच्या आत विद्यापीठाकडून जाहीर करण्यात आले आहेत. सद्यःस्थितीत सर्व आरोग्य विज्ञान विद्या शाखांचे पदवीच्या ७४ हजार ६६१ विद्यार्थ्यांचे सर्व वर्षांच्या हिवाळी २०२१ परीक्षांच्या प्रात्यक्षिक परीक्षा व लेखी परीक्षांचे उत्तरपत्रिकांचे मूल्यमापन सुरू आहे. या परीक्षांचे निकाल मे २०२२ अखेरीस जाहीर केले जाणार आहे.

बातम्या आणखी आहेत...