आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआरोग्य सैनिक सर्वांच्या आरोग्यासाठी आपली सेवा देत असतात आणि हे करताना त्यांच्या स्वतःच्या आरोग्याकडे त्यांचे कळत नकळत दुर्लक्ष होत असते. त्यामुळे भविष्यात काही गंभीर आजारांना त्यांना सामोरे जावे लागू नये म्हणून आरोग्य शिबिराद्वारे त्यांना सुदृढ आरोग्याचे धडे देण्यात आले. शिबिरामध्ये शंभराहून अधिक आरोग्य सैनिकांची व त्यांच्या कुटुंबियांची गंजमाळ येथील सभागृहात मोफत तपासणी करण्यात येऊन मार्गदर्शन करण्यात आले.
सीपीआरचे प्रात्यक्षिक
वाढता ताणतणाव, जीवनशैलीमधील बदल यामुळे तरुणांपासून वृद्धांमध्ये मधूमेह, रक्तदाब आणि हृदयविकार अशा समस्यांचा धोका वाढला आहे. हृदयविकाराच्या झटक्यानंतर तात्काळ उपचार मिळणे गरजेचे आहे. कारण झटक्यानंतर हॉस्पिटला पोहचण्यापर्यंतचा प्रत्येक मिनिट त्या व्यक्तीसाठी गरजेचा असतो. तीव्र झटक्यानंतर श्वासोश्वास चालू नसणार्या रुग्णाला सीपीआर म्हणजेच cardio-pulmonary-resuscitation मदतीचे ठरते. यामुळे रक्ताभिसरण आणि श्वसन नियमित होऊन पुढील मदत मिळेपर्यंत ती व्यक्ती जिवंत राहण्याची शक्यता वाढते.
सीपीआर अभावी रुग्णाची जिवंत राहण्याची शक्यता 10% नी कमी होते. म्हणूनच तुमच्या नजीकच्या व्यक्तीला हृदयविकाराचा झटका आल्यास सी.पी.आर. कशी आणि केव्हा कराल याचे प्रात्यक्षिक डॉ अनिता नेहेते व डॉ. निनाद चोपडे यांनी करून दाखविले. उपस्थितांमधील काही शिबिरार्थींनी सुद्धा सी. पी. आर. प्रात्यक्षिकात स्वतः भाग घेऊन त्याबातीत प्राथमिक माहिती करून घेतली.
तज्ञ डॉक्टर्सने केली तपासणी
शिबिरासाठी पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन संचालक डॉ.आवेश पलोड, यांची प्रमुख उपस्थिती होती. तज्ज्ञ डॉक्टरांच्या टीमने या तपासणी शिबिरात सहभाग घेतला. रोटरी क्लब ऑफ नासिकच्या अध्यक्षा डॉ. श्रीया कुलकर्णी, डॉ. ओजस कुलकर्णी, डॉ. हर्षल आढाव, डॉ. अंजना महाजन, डॉ. चंद्रकांत संकलेचा, डॉ. नागेश मदनूरकर, डॉ. रचना चिंधडे, डॉ. महेश मंगळूरकर, डॉ.हितेंद्र महाजन, डॉ. सुनीता संकलेचा, डॉ.रुशिका पटेल, डॉ.अंजली कुलकणींं, डॉ. प्रतिमा कानडे या निष्णात डॉक्टर्सनी तपासणी केली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.