आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:हार्ट फेल्युअर अपडेट परिषद; हृदयरोग उपायांवर मंथन

नाशिक18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मॅग्नम मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल आणि एपीआय नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने नाशकात घेण्यात आलेल्या सिम्पोजियम २०२२ हार्ट फेल्युअर अपडेट या परिषदेत हृदयरोग, त्यावरील आधुनिक उपाययोजना, तंत्रज्ञान, उपकरणे याविषयी तज्ज्ञानी मंथन केले.या परिषदेत हृदयरोगावरील नवीन संशोधन उपस्थितांसमोर मांडले.

या परिषदेत हृदयविकाराची लक्षणे, उपाय याबरोबरच नवनवीन संशोधनावर चर्चा झाली. तज्ज्ञ प्राध्यापकांनी त्यांचे अनुभव आणि हृदयविकाराचा सामना करण्यासाठी जगभरात उपलब्ध नवीन तंत्रे आणि तंत्रज्ञानाची माहिती दिली. डॉ. सुहास हरदास आणि डॉ. प्रियांका सिन्हा, डॉ. राजेश बदानी, डॉ. प्रवीण कुलकर्णी, डॉ. व्यंकट नागराजन यांनीही परिषदेत मुद्दे उपस्थितांसमोर मांडले. परिषदेमध्ये देशभरातील एकूण २५० तज्ज्ञांनी सहभाग नोंदवला.

डॉ. मनोज चोपडा यांनी हृदयरोगाची लक्षणे आणि हृदयविकाराचा झटका येऊन अचानक मृत्यू होणे, त्याची ठरावीक कारणे आणि हे मृत्यू रोखण्यासाठी रुग्णांवर वेळीच उपचार करण्यासाठीच्या पद्धतीवर मार्गदर्शन केले.

डॉ. अभिजित पाठक यांनी हृदयविकार झालेल्या रुग्णांवरील उपचार आणि नियोजन यावर मत मांडले. डॉ. सुनील साठे यांनी हृदयविकारात घ्यावयाच्या सर्वोत्कृष्ट वैद्यकीय उपचारांवर प्रकाश टाकला. डॉ. अजित भागवत यांनी हृदयरोगावरील औषधी आणि ‘एसजीएटी-२’ तसेच ‘एआरएनआय’याची उपचारातील भूमिका यावर,मार्गदर्शन केले.

डॉ. विलास मगरकर यांनी आर. व्ही. फेल्युअर रुग्णाची केस कशी हाताळावी यावर ऊहापोह केला. डॉ. राजेश धोपेश्वर यांनी हार्ट फेल्युअरचे प्रमाण आणि त्यावर औषधोपचारांची पद्धती यावर विवेचन केले. डॉ. आशिष नाबर यांनी हृदयरोगावर उपचार करण्यासाठी उपयुक्त ठरणाऱ्या विविध पद्धती आणि प्रणाली यांचा संयुक्तपणे वापर यावर भाष्य केले.

बातम्या आणखी आहेत...