आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एसएमबीटी ठरतेय वरदान:72 तासांत 52 बालकांवर हृदय उपचार ; शिरपूर-एसएनबीटीपर्यंत ग्रीन कॉरिडॉर

नाशिक24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

एसएमबीटी हॉस्पिटलकडून आयोजित हृदयविकार शस्रक्रिया आणि उपचार शिबिरात ७२ तासांत ५२ बालकांवर मोफत यशस्वी हृदय उपचार व शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे, पहिल्यांदाच शिरपूरहून धुळे आणि धामणगाव येथील एसएमबीटी हॉस्पिटल कॉरिडाॅर साकारण्यात आला. याद्वारे तत्काळ खासगी वाहनातून ६२ बालकांसह नातेवाइकांना हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले.

शिरपूर, साक्री व मालेगाव परिसरातील सर्वाधिक बालकांचा यात समावेश होता. ऑगस्ट महिन्यात आयोजित करण्यात आलेल्या शिबिरामध्ये २४८ बालकांच्या पालकांनी नोंदणी केली होती. त्यातील १६३ रुग्णांनी शिबिरात तपासणी करण्यात आली. यातील ६५ बालकांचे स्क्रीनिंग करण्यात आले होते. या आरोग्य शिबिरासाठी आमदार अमरिशभाई पटेल यांच्या इंदिरा गांधी मेमोरियल हॉस्पिटलने सहकार्य केले. एसएमबीटी हॉस्पिटलमध्ये हृदयविकार कक्ष हा स्वतंत्र विभाग रुग्णसेवेसाठी २४ तास कार्यरत आहे. या विभागात गत सात वर्षांत हृदयविकारांवरील १८ हजारपेक्षा अधिक रुग्णांवर यशस्वी उपचार करण्यात आले आहेत.

मुलीवर यशस्वी उपचार
मूळ जळगावचे रहिवासी असून मुलीवर हृदय उपचार करण्याची गरज असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. एसएमबीटीमध्ये योग्य मार्गदर्शन मिळाले. यशस्वी उपचारानंतर मुलीला नवा जन्मच दिला आहे.
- संतोष सोनवणे, यज्ञाचे वडील

आनंदाला पारावार नाही
ऑपरेशनसाठी माेठा खर्च येणार हाेता. एसएमबीटीमध्ये शिबिर असल्याचे समजताच संपर्क साधला. माझ्या पुतण्याच्या चेहऱ्यावरील समाधान पाहून आनंद होत आहे.- रवींद्र पावरा

बातम्या आणखी आहेत...