आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराज्यात विदर्भ तापला असून रविवारी (दि.१४) तेथील ९ शहरांत पारा चाळिशीपार होता. अकोल्यात सर्वाधिक ४५.५ अंश सेल्सिअस तापमान नोंदविण्यात आले. राज्यातही १७ शहरांतील पारा चाळिशीपार होता. नाशकात तापमानात घसरण झाली असून येथे ३६.३ तापमान नोंदवले गेले. दरम्यान, आगामी पाच दिवस कमाल तापमान हे सरासरी इतके राहणार असल्याचा अंदाज हवामान तज्ञ माणिकराव खुळे यांनी वर्तवला आहे. राज्यातील काही भागांत गेल्या पाच दिवसांपासून उष्णतेची तीव्रता वाढली आहे.
राज्यात निवडक शहरांतील तापमान
अकोला ४५.५, अमरावती ४५.४, वर्धा ४४.९, नागपूर ४४.३, यवतमाळ ४३.५, चंद्रपूर ४३.२, जळगाव ४३.२, बीड ४२.७, नांदेड ४२.६, गोंदिया ४२.५, ब्रम्हपुरी ४२.०, गडचिरोली ४१.८, परभणी ४१.४, नगर ४१.४, सोलापूर ४१.१, छत्रपती संभाजीनगर ४१.०, बुलडाणा ४०.८, पुणे ३७.५, सांगली ३७.४, नाशिक ३६.३, मुंबई ३४.८.
दक्षिण हरियाणामध्ये समुद्र सपाटीपासून ९०० मीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत तर पूर्व उत्तर प्रदेशातील चक्राकार वाऱ्यांची स्थिती निवळली आहे. आज (ता. १५) राज्यात कमाल तापमानातील चढ-उतार होण्याबरोबरच, दमट आणि उष्ण हवामान अधिक त्रासदायक ठरण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
म्यानमार-बांगलादेश किनारपट्टीवर धडकले मोचा
चक्रीवादळ ‘मोचा’ रविवारी दुपारी म्यानमार-बांगलादेशच्या किनारपट्टीवर धडकले. बंगालच्या उपसागरावरून ते म्यानमारमधील के सि तवे येथून ३० किमी आणि बांगलादेशातील कॉक्स बाजारापासून १४५ किमी दूर किनारपट्टीवर धडकले. ताशी २१० किमी वेगाने वारे वाहत आहेत.म्यानमारच्या रेखाइन प्रांतात चक्रीवादळाने कहर केला. विविध घटनांमध्ये ६ जणांचा मृत्यू झाला आहे. मोचा सोमवारपर्यंत धोकादायक होण्याची शक्यता आहे. नाशिकमध्ये पारा घसरला, तापमान ३६.३ अंशावर
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.