आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हवामान:विदर्भात उष्णतेची लाट; पश्चिम, उत्तर महाराष्ट्रात पावसाचा अंदाज, आगामी चार दिवस उष्णता राहणार

नाशिक2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यात उष्णतेची लाट काही भागात ओसरली असली तरी विदर्भात व मराठवाड्यातील ठरावीक जिल्ह्यांमध्ये उष्णतेची ही लाट कायम होती.

विदर्भातील गडचिरोली जिल्ह्यात ढगाळ वातावरण होते. मात्र, इतर जिल्ह्यांत उन्हाची तीव्रता कायम होती. दरम्यान, नाशिक जिल्ह्यात दिवसभर ढगाळ वातावरणामुळे कमाल तपमानात सोमवारी घट झाली. राज्यात मार्च महिन्यातच कडाक्याच्या उन्हाळ्याचा सामना करावा लागत आहे. मात्र बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने कोल्हापूर, सांगली, सातारा, नाशिक जिल्ह्यांत सकाळपासून ढगाळ वातावरण होते. तसेच दोन दिवसांत पुन्हा राज्यातील काही भागांत हलक्या स्वरूपाच्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

चार दिवस उष्णता राहणार
आगामी तीन ते चार दिवस कमाल तापमान कायम राहणार आहे. २२ मार्चपर्यंत दक्षिण मध्य महाराष्ट्र, तर २३ ते २५ मार्चदरम्यान दक्षिण कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांतील काही ठिकाणी अवकाळी पावसाचा अंदाज आहे. - सुषमा नायर, हवामान शास्त्रज्ञ, कुलाबा वेधशाळा

बातम्या आणखी आहेत...