आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Nashik
  • Rain Update Maharashtra | Heavy Rain In Mahathwada And Kokan | Heavy Rain Forecast In The State From Today Till 14th, Favorable Conditions For Return Of Monsoon Rains

हवामान खात्याचा अंदाज:राज्यात आजपासून 14 पर्यंत मुसळधार पावसाची शक्यता, परतीच्या पावसासाठी वातावरण अनुकूल

नाशिक23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यात ७ ते १४ सप्टेंबरदरम्यान विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा अंदाज हवामानतज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे गणेश विसर्जनावेळी प्रशासनासह भाविकांना काळजी घ्यावी लागणार आहे. दरम्यान, मंगळवारी मराठवाड्याला जोरदार पावसाने झोडपून काढले.

मुंबई, रत्नागिरी, रायगड, गोंंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, नांदेड व औरंगाबाद जिल्ह्यांत अतिजोरदार पावसाचा अंदाज आहे. नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार जिल्ह्यांत मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो. दरम्यान, ३० सप्टेंबर राेजी संपणाऱ्या मान्सूनमध्ये परतीच्या पावसासाठी वातावरण अनुकूल होत आहे.

राज्यात मंगळवारी विविध शहरांतील पर्जन्यमान : नाशिक १, परभणी २४, कुलाबा १६, सांगली २१, वेंगुर्ला ३, औरंगाबाद ५७, कोल्हापूर १८, पुणे १५, जालना २०.

बातम्या आणखी आहेत...