आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जोरदार पावसाचा इशारा:विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, कोकणासह घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा अंदाज

नाशिक4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, घाटमाथा आणि कोकणात २२ व २३ ऑगस्टला जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. विदर्भात २३ आॅगस्टला यलो अलर्ट जारी केला आहे. हवामान खात्याने २१ ते २३ ऑगस्टदरम्यान जोरदार पावसाचा इशारा दिला होता, मात्र पहिल्याच दिवशी पावसाने उघडीप दिली.

बंगालच्या उपसागरात वादळी प्रणालीमुळे विदर्भात ढग दाटून आले आहेत. मान्सूनचा आस असलेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचे टोक हिमालयाच्या पायथ्याकडे सरकले असून पूर्व टोक हे वाराणसीसह तीव्र कमी दाब क्षेत्राचे केंद्र असलेल्या आग्नेय बंगालच्या उपसागरापर्यंत कायम आहे.

बातम्या आणखी आहेत...