आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO जेसीबीच्या मदतीने नागरिकांचे रेस्क्यु:सिन्नर तालुक्यात पावसाचा धुमाकूळ, अनेक घरे पाण्याखाली

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

आठवडाभर विश्रांती घेतलेल्या पावसाने नाशिक जिल्ह्यात पुन्हा धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली आहे. सिन्नर तालुक्यात झालेल्या जोरदार पावसामुळे अनेक वस्त्यांमध्ये पाणी शिरले. त्यामुळे अक्षरश: JCB वर बसवून नागरिकांची सुटका करण्यात आली.

सिन्नर तालुक्यात गुरुवारी रात्री ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. त्यामुळे तालुक्यातील अनेक रस्ते पाण्याखाली गेले. नदीकाठच्या अनेक वस्त्यांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांचे मोठे नुकसान झाले. काही नागरिक या पुरात अडकले होते. अशात येथील नागरिकांचे रेस्क्यु करतानाचा व्हिडिओ आता समोर आला आहे.

व्हिडिओमध्ये जेसीबीच्या मदतीने नागरिकांचे रेस्क्यू केले जात असल्याचे दिसत आहे. जवळपास 33 नागरिकांना जेसीबीवर उभे करून त्यांना पुराबाहेर काढण्यात आले. दरम्यान, सिन्नरमध्ये मुसळधार पावसामुळे रात्रीपासूनच घटनास्थळावर मदतकार्य करण्यासाठी शासकीय यंत्रणा दाखल झाल्या आहेत.

दुसरीकडे, नाशिक रोड येथील वंजारवाडीत रात्री 10 वाजता पावसाने कहर केला. शेत जमिनींमधील पिकांसह माती वाहून गेल्याने अंदाजे 100 हेक्टर शेतीचे नुकसान झाले. अनेक घरे पाण्यात गेल्याने एकूण 80 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात येते.

नुकसानग्रस्तांना मदतीची मागणी

वंजारवाडीतील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकांचे त्वरित पंचनाम्यासाठी तहसीलदारांबराेबर बोलणे झाले आहे. नुकसान झालेल्या ग्रामस्थांना देखील आर्थिक मदतीची मागणी केली आहे, असे माजी आमदार योगेश घोलप यांनी सांगितले आहे.

पुन्हा उसनवारी

नाशिकचे शेतकरी ज्ञानेश्वर शिंदे यांनी सांगितले की, पावसामुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले. त्याचा एक रुपयाही मिळणार नाही. आता पुन्हा औषधे, खते, नर्सरीच्या रोपांच्या उधारीचे पैसे देण्यासाठी उसनवारी करावी लागणार आहे.

बातम्या आणखी आहेत...