आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराज्यात ५ ते १५ ऑगस्टदरम्यान ११ दिवस पुन्हा जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तथापि, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात ३१ जुलै ते ४ ऑगस्टपर्यंत उघडीप राहणार असून, काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे. मुंबईसह कोकण, उस्मानाबाद, लातूर, नांदेड, विदर्भ, कोल्हापूर, सांगली, सोलापूर या जिल्ह्यांतही हीच परिस्थिती राहील. हवामानतज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी सांगितले की, ५ ऑगस्ट ते १५ ऑगस्टपर्यंत ११ दिवस मान्सून पुन्हा ऊर्जितावस्थेत येणार आहे.
चंद्रपूरमध्ये वीज पडून चार महिला, हिंगोलीत १ ठार झाडाचा आश्रय घेतलेल्या महिलांच्या अंगावर वीज कोसळल्याने चौघींचा मृत्यू झाला. ही घटना वरोरा तालुक्यातील चिमूर मार्गावरील वायगाव भोयर शिवारात शनिवारी (३० जुलै) सायंकाळी घडली. शालिक झाडे यांच्या शेतात त्यांची पत्नी हिरावती शालिक झाडे, मधुमती सुरेश झाडे, पार्वता रमेश झाडे व रिता नामदेव गजबे या चौघी शेतात कामाला गेल्या होत्या. दरम्यान हिंगोलीत वीज कोसळून एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.