आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नागरिकांचे हाल:दुसऱ्या दिवशी धुवाधार पाऊस; नागरिकांची त्रेधा

नाशिकरोड19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार नाशिक शहरात बुधवारी (दि. ७) सायंकाळी धुवाधार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे काही मिनिटांतच रस्ते पाण्याखाली गेले. त्यामुळे खड्डे दिसत नसल्याने नागरिकांचे हाल झाले.

शहरात सांयकाळी साडेपाच वाजेपासून रात्री उशिरापर्यंत नाशिक शहरासह सिडको, सातपूर, कामटवाडे, तिडके काॅलनी, कॅनडा काॅर्नर, मायको सर्कल, सिटी सेंटर माॅल, पाथर्डी फाटा, इंदिरानगर, नाशिकरोड, देवळाली कॅम्प, जेलरोड, जयभवानीरोड, गंगापूररोड, पंचवटी, द्वारका, म्हसरुळ, जुने नाशिक, वडाळारोड, अशोका रोड या परिसरात जोरदार पाऊस झाला. पावसाचा वेग जोरात असल्याने रस्त्यांवर पाणी साचले होते. रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी महापालिका अधिकाऱ्यांना अपयश आल्याने नागरिकांची खड्ड्यातील पाण्यामुळे गैरसोय झाली होती.हवामान विभागाने आगामी १४ सप्टेंबरपर्यंत मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज वर्तविला आहे, तसेच गणेश विसर्जनाच्या वेळी देखील काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

बातम्या आणखी आहेत...