आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापावसाने शनिवारी काही ठिकाणी उघडीप दिली. मात्र, आता महाराष्ट्रासह दक्षिणेकडील ४ ते ५ राज्यांत पावसाला अनुकूल वातावरण आहे. रविवारी अनेक ठिकाणी पाऊस झाला. सोमवारपासून १५ आगस्टपर्यंत पुन्हा मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रात ठिकठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे, अशी माहिती हवामानतज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी दिली. रविवारी नांदेड, लातूर, उस्मानाबाद, नाशिक, पुणे, सातारा, कोविविध शहरांतील पाऊस
नांदेड २२ उस्मानाबाद १८ परभणी १३ औरंगाबाद २ नाशिक ७ सोलापूर २० अमरावती १ ब्रह्मपुरी ३ गोंदिया १ नागपूर १ वर्धा १३ यवतमाळ १० माथेरान ३० सांताक्रुझ ७ सातारा १९ कोल्हापूर १२ डहाणू ५८ रत्नागिरी ५४ बारामती ३ सांगली १ वेंगुर्ला २ कुलाबा ७
कोल्हापूर जिल्ह्यांतील घाटमाथ्यावर, डहाणू, मोखाडा, त्र्यंबकेश्वर, पेठ, सुरगाणा, नवापूर, नंदुरबार, तळोदा, अक्कलकुवा, धडगाव, रावेर, जामोद, धामणी, वरूड, नरखेड, सावनेर, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, सोलापूर, सांगली, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांत ठिकठिकाणी पाऊस झाला.
राज्यासह दक्षिणेकडील ४ ते ५ राज्यांत अनुकूल वातावरण
मान्सूनचा आस सक्रिय असून तो त्याच्या सरासरी जागेपासून दक्षिणेकडे स्थलांतरित झाला. तो आगामी ४ ते ५ दिवस आहे त्याच जागेवर स्थिर राहण्याची शक्यता आहे. बंगाल, ओडिशा आणि आंध्र प्रदेशच्या उत्तर किनारपट्टीवर चक्रीय वाऱ्याची स्थिती असून त्याच ठिकाणी सात किलोमीटर उंचीवर तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचे डिप्रेशनमध्ये रूपांतर झाले आहे. त्यामुळे महाराष्ट्रासह दक्षिणेकडील ४ ते ५ राज्यांत पावसाला अनुकूल वातावरण तयार झाले आहे.- माणिकराव खुळे, हवामानतज्ज्ञ.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.