आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस:बीड, औरंगाबाद जिल्ह्यात दमदार वृष्टी; अनेक भागांत साेयाबीन, कपाशी पाण्यात

नाशिक/ औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यातून परतीच्या पावसाने वाटचाल सुरू केली नसली तरी सध्या यासाठी अनुकूल वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे मराठवाडा, कोकण, पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस होत असून गुरुवारी रात्रीपासून औरंगाबाद शहर व जिल्ह्यासह, बीड, सोलापूर या जिल्ह्यांतील अनेक भागाला पावसाने झोडपले.

बीडसह, पाटोदा, आष्टी, गेवराई या तालुक्यांतील सात महसुली मंडळांमध्ये ६५ मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस झाल्याने अतिवृष्टी नोंदवली गेली.जिल्ह्यात सोयाबीनसह कापसाचे मोठे नुकसान झाले. अंबाजोगाई आणि केज तालुक्यातही दमदार पाऊस झाला. केज तालुक्यात ६० हजारहून अधिक हेक्टरवर पेरलेले सोयाबीन पीक पाण्यामुळे धाेक्यात आले आहे. पैठण तालुक्यात जोरदार पावसामुळे अनेक ठिकाणी नदी-नाल्यांना पूर आला आहे.

१४ ऑक्टोबरपर्यंत राज्यात जोरदार पावसाची शक्यता राज्यातून परतीच्या वाटेवर असलेला पाऊस १४ ऑक्टोबरपर्यंत राहणार असल्याचा अंदाज हवामानतज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी व्यक्त केला आहे. मराठवाडा परिसरात शुक्रवारपासून तीन दिवस जोरदार तर मध्य आणि पश्चिम महाराष्ट्र, खान्देश व नाशिकसह नगर, पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूरपर्यंत ४ दिवस मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे.

बातम्या आणखी आहेत...