आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माेठे नुकसान:नैताळे परिसरात मुसळधार पाऊस; नाल्याला 20  वर्षांनंतर माेठा पूर

लासलगाव2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

निफाड तालुक्यातील नैताळे परिसरात शनिवार (दि.१ ) दुपारी झालेल्या ढगफुटीसदृश पावसाने गावाशेजारील नाल्याला २० वर्षांनंतर माेठा पूर आला. पुराचे पाणी अनेक दुकांनामध्ये घुसले तर गावातील आदिवासी वस्तीमधील अनेक घरांतील सामान वाहून गेल्याने त्यांचे माेठे नुकसान झाले. तसेच नाशिक- औरंगाबाद महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.

जाेरदार पावसाने अनेक शेतकऱ्यांच्या शेतात माेठ्या प्रमाणात पाणी साचल्याने पिके पाण्याखाली गेली आहेत. त्यामुळे महसूल विभागाने तसेच कृषी विभागाने नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी करण्यात येत आहे. या परिसरामध्ये १५ ते २० वर्षानंतर इतका पाऊस झाल्याचे काही जाणकारांचे मत आहे.

बातम्या आणखी आहेत...