आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाहनचालकांना त्रस्त‎:नागजी चौकामध्ये प्रचंड वाहतूक‎ कोंडी, वाहनचालकांना त्रस्त‎

नाशिक2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

वडाळा-पाथर्डी रस्त्यावरील जुने नागजी‎ चौक व सध्याच्या सह्याद्री रुग्णालयालगत असलेली‎ सिग्नल यंत्रणा वाहतूक पाेलिस कर्मचाऱ्याअभावी‎ शोभिवंत वस्तू बनली असून, या सिग्नल यंत्रणेची‎ पायमल्ली केली जात असल्याने वाहनचालकांना‎ वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे.‎

सह्याद्री रुग्णालयालगत असलेल्या चौफुलीवर‎ नेहमीच वाहतूक कोंडी आणि लहान-मोठ्या‎ अपघातांची दखल घेत लाखो रुपये खर्च करून‎ सिग्नल यंत्रणा बसविण्यात आली, परंतु शहर‎ वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याची या ठिकाणी नेमणूक न‎ केल्याने सिग्नल यंत्रणा फक्त नावापुरतीच असल्याचे‎ दिसून येत आहे. या चौकात दिवसभर वाहनांची मोठी‎ वर्दळ असते. परंतु वाहतूक पोलीस नसल्याने‎ वाहनधारक सिग्नल न पाळता वाहने हाकत‎ असल्याने कोंडी नित्याचीच झाली आहे.‎

बातम्या आणखी आहेत...