आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:पुस्तकांअभावी घरीच थांबलेल्या विद्यार्थिनीस मदत; प्रहार संघटनेने घेतला पुढाकार, गरीब मुलांना पुन्हा शिक्षण प्रवाहात आणण्याचा प्रयत्न

नाशिक4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

वह्या- पुस्तके खरेदी करण्यासाठी पैसे नसल्याने इयत्ता ९ वीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीने शाळा सोडून दिली होती. ही बाब समजल्याने प्रहार संघटनेच्या उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख दत्तू बोडके यांनी या मुलीला वह्या - पुस्तके देतानाच पुढील शिक्षणाची जबाबदारी घेऊन तिला पुन्हा शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणले.

निफाड तालुक्यात पिंपळस रामाचे येथील के. के. वाघ शाळेत इयता नववीची विद्यार्थीनी साक्षी सावळीराम बागुल हिची घरची परिस्थिती गरिबीची आहे. त्यामुळे वह्या-पुस्तके घेण्यासाठी पैसे नसल्याने ती शाळेत जात नव्हती. ती शाळेत येत नसल्यामुळे शाळेनेही तिच्या गैरहजेरीबाबत पालंकाना पत्र पाठवले होते.

लॉकडाऊननंतर शाळा सुरू होऊन परीक्षेसाठी एक महिनाच राहिला असताना पुस्तकाविना साक्षी बागुल हिची गैरसोय होत असल्याची माहिती दिव्यांग राष्ट्रीय खेळाडू व कोच खंडू कोटकर यांना मिळाली. त्यांनी तत्काळ प्रहार संघटनेचे पदाधिकारी बोडके यांच्याशी संपर्क साधून त्यांना परिस्थिती सांगितली. बोडके यांनी साक्षीची आस्थेने विचारपूस करून तिला इयता नववीची वह्या-पुस्तके व इतर शालेय साहित्य घेऊन दिले.

इतकेच नव्हे तर साक्षी व तिच्या आईची माध्यमिक शिक्षणाधिकारी कदम यांच्याशी भेट घडवून आणत त्यांना परिस्थिती सांगितली.शिक्षणाधिकाऱ्यांनी तत्काळ के. के. वाघ माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक कुशारे यांच्याशी संपर्क साधून यापुढे वह्या - पुस्तकांपासून कुणीही वंचित राहणार नाही याबाबत दक्षता घेण्यास सांगतानाच शिष्यवृत्तीबाबत योग्य ती कार्यवाही करण्यास सांगितले. विशेष म्हणजे पुर्ण अनुदानित शाळेबाबत हा प्रकार घडल्याने बोडके यांनी शिक्षणाधिकाऱ्यांचे या प्रकरणाकडे लक्ष वेधले. यावेळी खंडू कोटकर, शाम गोसावी, रुपेश परदेशी, प्रेम परदेशी आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...