आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लाच:चेक बाउन्सप्रकरणी मदत; दोन हजारांची लाच घेताना पोलिसाला रंगेहाथ पकडले

नाशिक22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

चेक बाउन्स प्रकरणात पकड वॉरंटमध्ये अटक न करता जामिनासाठी मदत करण्याचे सांगत तक्रारदाराकडून दोन हजारांची लाच घेताना ओझर पोलिस ठाण्याच्या कर्मचाऱ्याला रंगेहाथ अटक करण्यात आली आहे. रविवारी (दि. १२) दुपारी १२ वाजता सीतागुंफा परिसरात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ही कारवाई केली. कारभारी भिला यादव (५२) असे या पोलिसाचे नाव आहे.

एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदाराने उसनवार पैसे घेतले होते. त्याबदल्यात दिलेला चेक बाउन्स झाल्याने संबंधित व्यक्तीने त्यांच्याविरोधात खटला दाखल केला. या खटल्यात तक्रारदाराच्या विरोधात न्यायालयाने पकड वॉरंट काढले आहे. तक्रारदार हा ओझरमधील रहिवासी असल्याने ओझर पोलिस ठाण्याचे समन्स बजावणाऱ्या कारभारी यादवने तक्रारदाराला फोन करून बोलावले. पकड वॉरंटमध्ये जामीनदाराचे कागदपत्र घेऊन सहकार्य करण्यासाठी २ हजाराच्या लाचेची मागणी करत काळाराम मंदिर परिसरात बोलावले. तक्रारदाराने दिलेल्या तक्रारीनुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या निरीक्षक साधना इंगळे, सचिन गोसावी आदींच्या पथकाने सापळा रचून त्याला रंगेहाथ अटक केली.

बातम्या आणखी आहेत...