आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानाशकात भाजपाचे 10 व 11 फेब्रुवारी राेजी राज्यस्तरीय अधिवेशन हाेत असून या अधिवेशनाच्या तयारीच्यानिमित्ताने एका पदाधिकाऱ्याने शहरातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची नावे सांगत तथाकथित दानशुर व्यक्तींकडून मागितलेली हेल्फ विथ द डिफरन्स‘ चर्चचा विषय ठरली आहे.
मुळात, अधिवेशनासाठी काेणतीही जमवाजमव करण्याबाबत स्थानिकपातळीवर सुचना नसताना नेमक्या काेणाच्या आदेशाने हा प्रपंच होत आहे असाही प्रश्न चर्चत आहे. दरम्यान, ऐच्छिक ऐवजी मदतीचा भाग हा सक्तीचा हाेवू लागल्यानंतर काही विकासकांनी थेट राज्यस्तरीय प्रमुख नेत्यांकडे धाव घेण्याची तयारी सुरू केल्यामुळे स्थानिक पातळीवरील काही हाैशी पदाधिकारी अडचणीत येण्याची शक्यता आहे.
भाजपाने वर्षभरावर येवून ठेपलेल्या लाेकसभा व विधानसभा निवडणुकीची रणनिती ठरवण्यासाठी नाशिकची निवड केली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या दाैऱ्यामुळे अधिवेशनाचे महत्व वाढले असून आगामी वाटचालीसाठी ही बाब महत्वाची असल्याची लक्षात घेत अधिवेशन जाेरदार करण्याचे प्रयत्न सुरू झाले. जाेरदार करण्यासाठी सर्वच प्रकारची ‘जमवाजमव’ करणे महत्वाचे असल्यामुळे मग त्यासाठी शहरातील काही दानशुरांचा शाेध सुरू झाला आहे.
त्यातून बांधकाम क्षेत्रात चमकदार कामगिरी करणाऱ्या काही विकसकांना मदतीसाठी आग्रह धरला जात असल्याचे बाेलले जाते. काही दानशुरांना तर आपल्या दरबारात पाचारण करून मदत तर करायचीच मात्र आमच्या मनाप्रमाणे अशी दमबाजीही झाल्याचे वृत्त आहे. दरम्यान, नेहमीच वेगवेगळ्या माध्यमातून आम्ही मदत करीत असल्यामुळे आता सक्ती नकाे, एेच्छिक मार्ग ठेवा अशीही विनवणी झाल्याचे समजते. दरम्यान, याबाबत काही दानशुरांनी थेट राज्यातील प्रमुख नेत्यांच्या कानावर प्रकार घातल्यानंतर त्यांनी अशापद्धतीची काेणतीही जमवाजमव करण्याबाबत सुचना दिल्या नसल्याचा खुलासा केल्यामुळे गाेंधळ वाढला आहे. हे प्रकरण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडेही गेल्याची चर्चा आहे.
डेमाेक्राॅसी हाॅलसाठी रस्ता करणार काेण ?
सातपूर येथील डेमाेक्राॅसी हाॅलमध्ये अधिवेशन जवळपास निश्चित झाले आहे. त्यासाठी हाॅलचे भाडे व सजावटीचाच खर्च 40 लाखांच्या घरात गेल्याचे वृत्त आहे. दरम्यान, याठिकाणी एक अंतर्गत रस्ताही गरजेचा असल्याचा मुद्दा पुढे आला आहे. हा रस्ता आम्ही करून देताे अशी भुमिका भाजपाच्या काही पदाधिकाऱ्यांनी घेतल्याची चर्चा असून जर रस्ता करून देणार असेल तर मग हाॅलचे भाडे देण्याची गरज का असाही प्रश्न आहे. दरम्यान, हा रस्ता पालिका, राज्य सार्वजनिक बांधकाम विभाग की आमदार निधीतून केला जाणार असे प्रश्न चर्चत आहेत.
केवळ अडचणी जाणून घेण्यासाठी भेट
भाजप शहराध्यक्ष गिरीष पालवे म्हणाले की, शहरातील बांधकाम क्षेत्रातील काही तज्ञांसाेबत आमच्या भेटीगाठी सुरू असल्या तरी, त्या केवळ त्यांच्या अडअडचणी काय आहेत हे जाणून घेण्यासाठी सुरू आहेत. काेणत्याही पद्धतीची मदत वा वर्गणी मागितली गेलेली नाही.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.