आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानाशिक शहरातील महत्त्वपूर्ण प्रकल्प मार्गी लावण्यासाठी येत्या अर्थसंकल्पात निधी उपलब्ध करून देण्याची मागणी खासदार हेमंत गोडसे यांनी केली. याविषयीचे विशेष निवेदन आज हेमंत गोडसे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले.
जिल्ह्यावासियांना इतर जिल्ह्यांमध्ये जाण्यासाठीची कनेक्टिव्हिटी वाढावी व इतर राज्यामंध्ये दळणवळण वाढावे, भविष्यात शहरात होणारी वाहतुकीची कोंडी टळावी, सिहस्थपर्व विनासंकट आणि सर्व सोयी -सुविधा युक्त होणेकामी उपाययोजना कराव्यात यासह जिल्ह्याच्या विकासासाठी प्रस्तावित असलेल्या प्रकल्पांना निधीची तरतूद करून प्रकल्पांना गती द्यावी अशी मागणी खासदार हेमंत गोडसे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली.
खासदारांची विशेष बैठक
लवकरच विकासाविषयीचे प्रश्न मार्गी लावणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिली. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मुंबईत राज्यातील सर्वच पक्षांच्या खासदारांची विशेष बैठक बोलविली होती. यावेळी खासदार हेमंत गोडसे यांनी नाशिक जिल्ह्याशी निगडित असलेल्या विविध प्रश्नांविषयीचे विशेष निवेदन मुख्यमंत्री शिंदे यांना दिले.
सिपेट प्रकल्प मार्गी लावा
यामध्ये नासिक - पुणे प्रस्तावित लोहमार्गासाठी केंद्राच्या हिश्याचे वीस टक्क्यांच्या निधीला मंजुरी मिळावी,भविष्यात शहरात होणारी वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी प्रस्तावित असलेल्या निओ मेट्रो प्रकल्प उभारणीसाठी केंद्राच्या वाटयाचा वीस टक्के निधी तातडीने उपलब्ध व्हावा,केंद्र शासनाच्या सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ पेट्रोकेमिकल अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान ( सिपेट ) प्रकल्प तातडीने मार्गी लावावा.
GSTचा परतावा तातडीने मिळावा
अप्पर वैतरणा -कडवा -देवलिंग या नदी जोड प्रकल्पाचा सविस्तर अहवाल अंतिम टप्प्यात आलेला असून यासाठी लागणाऱ्या निधीची तरतूद येत्या अर्थसंकल्पात करावी, देवळाली कॅम्पसह राज्यातील सात कटक मंडळांना जीएसटीचा परतावा तातडीने मिळावा, यासाठी शासनाने निधी उपलब्ध करून द्यावा, महानगरपालिका हद्दीत मल: निसारणन केंद्र उभारणी आणि असलेले केंद्रांचे आधुनिकरण करण्यासाठी केंद्राकडे 400 कोटी रुपयांचा प्रस्ताव प्रलंबित आहे.
रस्त्याच्या कामासाठी निधी द्या
गांधीनगर येथील जीर्ण झालेल्या प्रेसची दुरावस्था दूर करण्यासाठी अडीचशे कोटी रुपयांचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात असून यासाठी केंद्राकडे पाठपुरावा करावा. अंजनेरी-ब्रह्मगिरी या दरम्यान प्रस्तावित रोपवे प्रकल्प असून या प्रकल्पासाठी निधीची तरतूद करावी, सिंहस्थ काळात वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी बाह्यरिंग रोड प्रस्तावित असून या कामासाठी तातडीने निधी उपलब्ध करून द्यावा.
मान्यता देण्याची मागणी
सूरत-चेन्नई या प्रस्तावित महामार्गामुळे नाशिक पाच राज्यांना जोडले जाणार असून याविषयीच्या प्रस्तावाला गती देण्यात यावी, प्रस्तावित किकवी धरणानातून दीड टीएमसी पाणी शहरासाठी उपलब्ध होणार असल्याने याकामासाठी येत्या अर्थसंकल्पात विशेष निधीला मान्यता देण्यात यावी अशा मागण्यांचा विशेष निवेदनात समावेश आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.