आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्लास्टर:पलंगावरून पडल्याने तीचा हात फ्रॅक्चर; हातावर उपचार न करता लावले नुसते प्लास्टर

नाशिक24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

एक मुलगी रात्री झोपलेली असताना पलंगावरून पडल्याने तीचा हात फ्रॅक्चर झाला. तिला उपचारासाठी शहरातील महापालिकेच्या बिटको रुग्णालयात नेल्यानंतर डॉक्टरांनी केवळ एक्सरे काढत कोणत्याही प्रकारचे उपचार न करता तिच्या हाताला प्लास्टर घातले. नातेवाइकांनी दोन दिवसानंतर पुन्हा खासगी रुग्णालयात एक्सरे काढला असता हाताचे हाडांचे दोन तुकडे झाल्याचे त्यात दिसून आले. याप्रकरणी नातेवाइकांकडून महापालिका आयुक्तांकडे लेखी तक्रार करण्यात आली आहे.

सानिया शेख हिच्याबाबत घडलेला हा प्रकार तिच्या कुटुंबीयांना त्रस्त करणारा ठरला. रात्री झोपलेली असताना पलंगावरून पडल्याने तीचा हात फ्रॅक्चर झाला. उपचारासाठी तीला महापालिकेच्या बिटको रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यावेळी असलेल्या अस्थिरोग तज्ज्ञांनी तिच्या हाताचा एक्सरे काढत प्लास्टर घातले. एक्स रे रिपोर्टमध्ये तीच्या हाताचे हाड तुटलेले असल्याचे स्पष्ट दिसत होते.

तरीही डॉक्टरांनी कोणत्याही प्रकारचे उपचार न करता केवळ हाताला प्लास्टर लावून सोडून दिले.त्यानंतर हात दुखत असल्याने नातेवाइकांनी पुन्हा रुग्णालयात धाव घेऊन डॉक्टरांना माहिती देत एक्स रे दाखविण्याची मागणी केली. मात्र, डॉक्टरांनी त्याच्या म्हणण्याकडे दुर्लक्ष केले. सानियाच्या कुटुंबीयांनी पुन्हा एक्स रे काढल्यानंतर हाताचे हाड तुटलेलेच असल्याचे दिसून आले. यानंतर नातेवाइकांनी महापालिका आयुक्तांसह वैद्यकीय अधीक्षकांकडे तक्रार केली. त्यावेळी डाॅक्टरांना चूक झाल्याचे मान्य केले. या प्रकरणी कारवाईचे आश्वासन वैद्यकीय अधीक्षक डॉ.बापूसाहेब नागरगोजे यांनी रियाज शेख यांना दिले.

बातम्या आणखी आहेत...