आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तणाव निर्माण:प्रेयसी घरी न आल्याने तिच्या भावाचा प्रियकराकडून खून

नाशिक24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रेमप्रकरणातून प्रियकराने मामाच्या मदतीने तरुणीच्या भावाचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार शनिवारी (दि. १०) रात्री १० वाजता फुलेनगर येथील मायको दवाखाना परिसरात घडला. रात्री उशिरापर्यंत पंचवटी पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.

पाेलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रवी सय्यद (१८, रा. मायकाे दवाखाना, कालिकानगर, फुलेनगर) याच्या बहिणीसोबत संशयित विशाल ताराळकरचे प्रेमसंबंध आहेत. तरुणीला संशयिताने काही दिवसांपूर्वी पळवून नेले हाेते. यामुळे दाेन्ही कुटुंबांत हाणामारीचा प्रकार घडला हाेता. दाेन दिवसांपूर्वी संशयिताने तरुणीला फोन करत ‘घरी ये, नाही तर तुझ्या एका भावाचा गेम करेन’ अशी धमकी दिली होती. रात्री संशयित विशाल ताराळकर, किरण कोकाटे यांनी रवी सय्यदवर हल्ला केला. यात रवीचा मृत्यू झाला. जिल्हा रुग्णालयात मृतदेह आणला असता नातेवाइकांनी गर्दी केल्याने तणाव निर्माण झाला होता.

बातम्या आणखी आहेत...