आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फसवणूक:पहिले लग्न लपवत दुसरे लग्न; तरुणीची फसवणूक

नाशिक8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोशल मीडियावरील ओळख करणे अकोला येथील एका तरुणीला चांगलेच महागात पडले. पतीने पहिले लग्न झाल्याचे लपवत विश्वासघात करत बळजबरीने शारीरिक संबंध ठेवल्याचा तर सासू-सासऱ्यांनी लग्न झाल्याचे लपवत फसवणूक केल्याची तक्रार पीडितेने दिली. याबाबत अकोला न्यायालयाच्या आदेशाने पतीवर बलात्काराचा तर सासू-सासऱ्यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा मुंबईनाका पोलिस ठाण्यात रविवारी (दि. १९) दाखल करण्यात आला आहे. पीडित विवाहितेने ३० जानेवारी २०२० रोजी अकोला न्यायालयात पतीसह सासरच्या विरोधात अर्ज दाखल केला होता.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती आणि पीडित विवाहितेने दिलेल्या तक्रारीनुसार, १ जानेवारी २०२० रोजी नाशिक येथील विनोद ढाकणे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून ओळख वाढवत जवळीक साधली.

बातम्या आणखी आहेत...