आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पदवी प्रदान सोहळा:2 वर्षांचा मुफ्ती अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या‎ 22 जणांना मुस्लिम धर्मातील सर्वोच्च पदवी‎

नाशिक‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

दावते इस्लामी इंडिया संस्थेचा‎ देशपातळीवर मुफ्ती पदवी प्रदान‎ सोहळा कालिदास कलामंदिरात झाला.‎ देशाच्या विविध शहरातील मुफ्ती पदवी‎ प्राप्त विद्यार्थ्यांना शहर-ए-खतीब‎ हिसामुद्दीन खतीब तसेच मौलाना‎ अताउल मुस्तफा मिस्वाही यांच्या हस्ते‎ पदवी प्रदान करण्यात आली. मदरसा‎ जामिअतुल मदिना संस्थेत २ वर्षे‎ शिक्षण घेत २२ विद्यार्थांनी पदवी प्राप्त‎ केली.‎ देशाच्या विविध शहरातील मदरसा‎ जामिअतुल मदिना संस्थेत मुफ्ती‎ अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या विद्यार्थांना‎ पदवी प्रदान करत त्यांचा सत्कार‎ करण्यात आला.

शहरातील मौलाना‎ सय्यद रमीज जाफर अलीमदनी‎ यांचाही यात समावेश आहे. विविध‎ प्रकारच्या धार्मिक पदविका प्राप्त‎ करणारे विद्यार्थी मोलवी यांच्यासह‎ मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ उपस्थित होते. सोहळ्याचे प्रमुख पाहुणे‎ मुरादाबाद येथील मौलाना अताउल‎ मुस्तफा मिस्बाही यांनी उपस्थिताना‎ धार्मिक मार्गदर्शन केले.‎ उर्दू अरेबिक, धार्मिक शिक्षणासह‎ व्यावहारिक अर्थात इंग्लिश, हिंदी अशा‎ विविध भाषांचे शिक्षण देखील‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ याठिकाणी घेता येणार असल्याचे‎ त्यांनी सांगितले. मुफ्ती पदविका प्राप्त‎ विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

सोहळ्याचे‎ आयोजक सय्यद शदाब यांनी‎ कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केला. तसेच‎ मदरसामध्ये असलेली शिक्षण प्रणाली‎ समजावून सांगण्यासह मदरशाबाबत‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ असलेले गैरसमज दूर करण्यासाठी‎ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात‎ आल्याची माहिती देण्यात आली. दावते‎ इस्लामी इंडियाचे अध्यक्ष सय्यद‎ आरिफ अली अत्तारी, सय्यद शदाब‎ अत्तारी, सलीम तंबोली आदींनी‎ कार्यक्रम यशस्वितेसाठी परिश्रम घेतले.‎

समाजात एकाेपा‎ ठेवण्याचे काम करणार‎‎
मदरसा जामिअतुल मदीना‎ संस्थेत मुफ्ती ‎पदविका पूर्ण ‎करणारे विद्यार्थी‎ समाजात एकाेपा‎ ठेवण्यासाठी ‎प्रयत्न करतील.‎ पदवी प्रदान करत त्यांचा सत्कार‎ करण्यात आला.सर्वोच्च मुफ्ती‎ पदविका प्राप्त विद्यार्थ्यांनी यासाठी‎ खूप मेहनत घेतली .‎ - सय्यद आरिफ अत्तारी, वरिष्ठ‎ धर्मगुरू,दावते इस्ल‍ामी‎

बातम्या आणखी आहेत...