आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO:हिंदू-मुस्लिम ऐक्याचे दर्शन:बाप्पाची विसर्जन मिरवणूक निघाली थाटात, अजान सुरू झाली अन् थांबला ढोलताशांचा गजर

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

कोरोना संसर्गाच्या दोन वर्षांच्या विघ्नानंतर राज्यात यंदा निर्बंधांविना गणेश उत्सव साजरा होत आहे. नाशिक शहरातही आज मोठ्या उत्साहात बाप्पाच्या विसर्जन मिरवणुका निघाल्या होत्या. मात्र, अचानक मिरवणूक मार्गावर दूधबाजार परिसरातील मस्जिद येथे अजाण सुरू झाली आणि ढोल-ताशांचा गजर थांबला. शिवसेवा या गणपती मंडळाच्या कृतीने सर्वच भारावून गेले.

नाशिक शहराने हिंदू-मुस्लिम ऐक्याचे दर्शन घडवल्याने त्यांचे सर्वत्र मोठे कौतुक होत आहे. सर्वांचा लाडका गणराया आज आपल्या घरी निघालाय. विसर्जन निर्विघ्न पार पडावे यासाठी सकाळपासून ठिकठिकाणी पोलिसांचा तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. अनेकठिकाणी वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आला आहे. दोन वर्षांनतर उत्सव साजरा होत असल्याने अनेक ठिकाणी बाप्पाच्या भव्य मिरवणुका काढण्यात येत आहेत. याठिकाणीही अशाचप्रकारचा जल्लोष पाहायला मिळाला.

देखावाही ठरला आकर्षण

नाशिक शहरातील मुख्य विसर्जन मिरवणुकीत 24 गणेश मंडळे सहभागी झाली होती. मिरवणूक मार्गावरील मशिदीत अजान सुरू झाल्याने शिवसेवा मित्र मंडळाने मिरवणुकीतले वादन थांबवले. शिवसेवा युवक मित्र मंडळाचा देखावाही मिरवणुकीचे आकर्षण ठरला होता. ढोल ताशांच्या गजरात महापालिकेचे गणपतीची मिरवणूक सुरू करण्यात आली होती. नाशिक शहरातील मानाचा पहिला गणपती रविवार कारंजा मंडळाचा चांदीच्या गणपतीचा रथ सहभागी झाला होता.

वरूणराजाही बरसला

गणपती बाप्पा मोरया, मंगलमुर्ती मोरया, पुढच्या वर्षी लवकर या..! या जयघोषात गणेश भक्तांनी लाडक्या बाप्पाला निरोप दिला. पावसाने मध्येच हजेरी लावल्याने बाप्पावर वरूणराजानेही वर्षाव केला. हजारो नागरिक मिरवणुकीत सहभागी झाले होते.

बातम्या आणखी आहेत...