आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागेल्या तीन वर्षांत जिल्हा उद्योग मित्रची (झूम) बैठक न झाल्याने उद्योजक संभ्रमात आहेत. औद्योगिक वसाहतीतील सुरक्षा व्यवस्था, पथदीप, नालेसफाई, पाण्याची कमतरता या प्रश्नांनी उद्योजक हैराण असून त्याबाबत तातडीने मार्ग काढण्यासाठी झूम बैठक तातडीने घेण्यात यावी, अशी मागणी त्रस्त उद्योजकांनी केली आहे.
जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक या बैठकीचे समन्वयक असतात. त्यांचीच भेट घेत उद्याेजकांनी या बैठकीच्या न होण्याने वाढलेल्या समस्यांची जाणीव त्यांना करून दिली. तातडीने या बैठकीचे आयोजन करावे अशी मागणी केली. अंबड, सातपूर, गोंदे या औद्योगिक वसाहतीतील २५०० हून अधिक सदस्य असलेल्या अंबड इंडस्ट्रीज अॅण्ड मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशनचे (आयमा) अध्यक्ष निखिल पांचाळ यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळातर्फे जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक संदीप पाटील यांची भेट घेतली. उद्योजकांचे अनेक मूलभूत प्रश्न आहेत. विविध समस्याही आहेत.
त्या सोडविण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत होणारी झूम (जिल्हा उद्योग मित्र) बैठक अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत असते. या बैठकीस सर्व यंत्रणांचे अधिकारी आवर्जून उपस्थित राहतात. उद्योजकांच्या प्रश्नांची तातडीने उकल होण्यास मदत होते. तीन वर्षांत ही बैठक न झाल्याने समस्यांची यादी वाढत चालली आहे. यापूर्वीही या बैठकीबाबत दोन निवेदने देण्यात आल्याची आठवणही पांचाळ यांनी यावेळी संबंधितांना करून दिली. शिष्टमंडळात आयमाचे उपाध्यक्ष राजेंद्र पानसरे, सरचिटणीस ललित बूब, चिटणीस गोविंद झा, योगिता आहेर, कोषाध्यक्ष राजेंद्र कोठावदे यांचाही समावेश होता.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.