आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपघात:हेल्मेटसक्तीला सुट्टी, विनाहेल्मेट चालक सुसाट

नाशिक2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

१ डिसेंबरपासून तीन दिवस धडाक्यात सुरू असलेली हेल्मेटसक्तीच्या कारवाईला रविवारी सुट्टी असल्याने शहरात विनाहेल्मेट चालक सुसाट असल्याचे निदर्शनास आले. रस्ते अपघातात विनाहेल्मेट चालकांचे मृत्यूचे प्रमाण वाढत असल्याने पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे यांनी हेल्मेट सक्ती कारवाई सुरू केली आहे. १ डिसेंबर ५४४ विनाहेल्मेट चालकांकडून २ लाख ७७ हजार, २ डिसेंबर ४४३ विनाहेल्मेट चालकांकडून २ लाख २५ हजार आणि ३ डिसेंबर राेजी ४२८ विनाहेल्मेट चालकांकडून २ लाख १५ हजार दंड वसूल करण्यात आला. तीन दिवस हेल्मेटसक्तीची धडक कारवाई सुरू होती. कारवाईच्या भीतीने बहुतांशी दुचाकीचालक हेल्मेट वापर करत असल्याचे निदर्शनास आले. मात्र, रविवारी या कारवाईला ब्रेक लागल्याने शहरात विनाहेल्मेट चालकांची संख्या पुन्हा वाढल्याचे दिसून आले. त्यामुले कारवाई सुरू ठेवण्याची मागणी हाेत आहे.

बातम्या आणखी आहेत...