आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिक:चिमुरडीवर केले घरीच उपचार; मुलीचा मृत्यू, पत्नीच्या तक्रारीनंतर पतीला अटक

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

वैद्यकीय क्षेत्राचे अर्धवट ज्ञान असलेल्या बापाने अवघ्या चौदा महिन्यांच्या आपल्या चिमुकलीवर घरीच चुकीचे उपचार केल्याने यात तिचा मृत्यू झाला. पत्नीच्या तक्रारीनुसार पतीवर पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. हेमंत शेटे (रा. मखमलाबाद रोड, पंचवटी) असे या पित्याचे नाव आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती आणि मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीनुसार, चौदा महिन्यांच्या चिमुकलीला निमोनिया झाला होता. एका रुग्णालयात उपचार सुरू होते. मुलीच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याने पित्याने वैद्यकीय अधिकाऱ्यांना मुलीस डिस्चार्ज देण्यास सांगितले. डाॅक्टरांनी मुलीवरील उपचार सुरू आहेत. तुम्ही तुमच्या जबाबदारीवर घेऊन जा, असे सांगितले. शेटे याने आम्ही मुलीला दुसऱ्या हाॅस्पिटलमध्ये दाखल करणार आहाेत, असे सांगून मुलीस घरी घेऊन आले. पत्नी आणि आईने यास नकार दिला होता. मात्र, शेटेने मला सिव्हिल हाॅस्पिटलमध्ये कामाचा अनुभव आहे. तसेच मी फार्मा कंपनीत कामास असल्याने काय उपचार करायचे हे मला माहिती असल्याचे सांगत पत्नीच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले. मुलीवर घरीच उपचार सुरू केले. या चुकीच्या उपचारात मुलीचा घरी मृत्यू झाला. याविरोधात पती- पत्नीमध्ये वाद झाले. पोटची मुलगी चुकीच्या उपचाराने गमावल्याने महिलेने पोलिसांत धाव घेत पतीच्या विरोधात तक्रार दिली. तक्रारीची दखल घेत महिलेच्या पतीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून अटक करण्यात आली आहे. वरिष्ठ निरीक्षक डाॅ. सीताराम कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे. दरम्यान, अशा प्रकारे माहिती नसताना कुणीही घरी उपचार करू नये, असे आवाहन डॉक्टरांनी केले आहे.

बातम्या आणखी आहेत...