आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानाशिक एज्युकेशन सोसायटी संस्थेचे शैक्षणिक, सांस्कृतिक व सामाजिक कार्य प्रेरणादायी आहे. संस्थेच्या सेवानविृत्त पदाधिकारी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचा एकत्रितपणे कृतज्ञता पूर्वक गौरव करणे एक आदर्श उपक्रम असल्याचे प्रतिपादन नाशिक जिल्हा परिषदेचे माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी प्रवीण पाटील यांनी केले.
नाशिक एज्युकेशन सोसायटीच्या सेवानविृत्त झालेल्या ७५ गुरुजनांचा व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा कृतज्ञता सोहळा परशुराम साईखेडकर नाट्यगृह या ठिकाणी झाला. यावेळी शिक्षणाधिकारी पाटील बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष प्रा. सूर्यकांत रहाळकर होते. उपाध्यक्ष प्रा. दिलीप फडके, चंद्रशेखर मोंढे, कार्यवाह राजेंद्र निकम, शिक्षक मंडळ अध्यक्ष प्रियंका निकम, उपाध्यक्ष नरेंद्र मोहिते ,कार्यकारी मंडळ सदस्य सरोजिनी तारापूरकर, जयदीप वैशंपायन, विश्वास बोडके मैथिली गोखले उपस्थित होते. सेवानविृत्त मुख्याध्यापक लक्ष्मण जाधव व रंजना सूर्यवंशी यांनी संस्थेबद्दल कृतज्ञता व्यक्त करणारे मनोगत व्यक्त केले. ओमकार वैरागकर व सारडा शाळेतील विद्यार्थिनींनी स्वागत गीत सादर केले. प्रास्ताविक उपाध्यक्ष प्रा. दिलीप फडके यांनी केले.
प्रमुख पाहुण्यांचा परिचय शैलेश पाटोळे यांनी करून दिला. सूत्रसंचालन दिलीप अहिरे व शालिनी बच्छाव यांनी केले तर उपाध्यक्ष चंद्रशेखर मोंढे यांनी आभार मानले. सुनीता पाटील, शोभा खैरे, उल्का रानडे, उमा आहेर, विजया खोडे, सुधाकर देशमुख, सुरेखा बोकडे, शुभदा घारपुरे, उज्वला कासार, भावना जगताप, प्रज्ञा जोशी, नंदा नेमाडे, अंजली सैंदाणे आदी पदाधिकारी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. यावेळी सत्कारार्थी शिक्षकांनी विद्यार्थी संस्कारश्रम बनविण्यासाठी आवाहन केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.