आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी एक्सक्लुसिव्ह:वापर होत नसल्याने रुग्णालय इमारत अन् साहित्याचीच बिघडतेय तब्येत; प्रयोगशाळा बंद अवस्थेत

नाशिकरोड8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • नाशिकरोडची बाळासाहेब ठाकरे रुग्णालय इमारत कामकाजाच्या प्रतीक्षेत; पाचशे बेडसह एमआरआय

नाशिकरोड येथे महापालिकेने पाच मजली रुग्णालयाची इमारत बांधली आहे. त्यात सर्व रुग्णांच्या उपचारासाठी लागणारे सर्व साहित्यही आहे. कोविडकाळात त्याचा उपयोग झाला. आता मात्र हे साहित्यच नव्हे तर संपूर्ण इमारतच धूळखात पडली आहे. वापरच होत नसल्याने वस्तू पडून आहेत, लोखंडी वस्तूंवर गंज चढू लागला आहे तर मेंटेनन्सचा खर्चही वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

शहरातून कोरोना हद्दपार झाल्यानंतर नाशिकरोड येथील शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे रुग्णालयाची इमारतच जणू आयसोलेशनमध्ये असल्यासारखी झाली आहे. या इमारतीत बिटको रुग्णालय स्थलांतर करण्यात येणार आहे, मात्र त्याला अद्यापही मुहूर्त लागत नसल्याने या इमारतीतील साहित्य वापराविना पडून आहे.

बातम्या आणखी आहेत...