आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नेत्रदीपक यश:हाॅटेल मॅनेजमेंट पदवीचा निकाल जाहीर; नाशिकच्या तिघांचे यश

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे हाॅटेल मॅनेजमेंटमधील बी. एस्सी. (हाॅस्पिटॅलिटी स्टडीज) या पदवी परीक्षेचा निकाल जाहीर झाला. पदवीच्या तिन्ही वर्षांचा निकाल विद्यापीठाने एकाचवेळी जाहीर केला. परीक्षेत नाशिकच्या अॅम्रो कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीत स्थान पटकावत नेत्रदीपक यश मिळवले आहे.

बी. एस्सी. (एच.एस.) तृतीय वर्षातील अजय होळकर (८५%), आयुष ठाकूर (८२%), राकेश तुंगार (८०%) तर द्वितीय वर्षातील विवेक मिश्रा, रिद्धी वाघ, भावेश नांद्रे, प्रथम वर्षातील श्रावणी धारणकर, चेतन कोळी, वलीहसन खान या विद्यार्थ्यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाचे यश पटकावले. सूरज एज्युकेशनलचे सचिव प्रा .सुनंदा सोनी, प्राचार्य डॉ. रोहन सोनी यांचे मार्गदर्शन लाभले.

बातम्या आणखी आहेत...