आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चोरी:शहरात तीन ठिकाणी घरफाेडी,‎ सहा लाख रुपयांचा एेवज लंपास‎

नाशिक‎24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरात घरफोडीच्या गुन्ह्यात वाढ‎ झाली असून गुरुवारी तीन शहरातील‎ गंगापूर, आडगाव, म्हसरुळ पोलिस‎ ठाण्याच्या हद्दीत ३ घरफोडीच्या‎ गुन्ह्यात ६ लाखांचा एेवज चोरी‎ करण्यात आला. चोरांना बंद घरांना‎ लक्ष करत घरफोडी केल्याचा‎ पोलिसांच्या तपासात पुढे आले.‎ पोलिसांनी दिलेली माहिती आणि‎ संध्या ठाकूर (रा. चौंडेश्वरीनगर,‎ आडगाव शिवार) यांनी दिलेल्या‎ तक्रारीनुसार, त्यांचे पद्मावती राेहाउस‎ आहे. घर बंद असतांना दरवाजाच्या‎ मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून‎ बेडरुममध्ये ठेवलेल्या लाकडी‎ कपाटातील दागिने असा ३ लाख २९‎ हजारांचा मुद्देमाल चोरी करुन नेला.‎

ठाकूर घरी आल्यानंतर त्यांच्या लक्षात‎ हा प्रकार आला. दुसऱ्या घटनेत मनोज‎ काकड (रा. शकुंतला निवास, जुना‎ चांदशीराेड ) यांचे मखमलाबाद गाव‎ मातोरी रोड येथे अोम हार्डवेअर हे‎ दुकान आहे. या दुकानाचा‎ पाठीमागील लोखंडी दरवाजाचे‎ कुलूप तोडून दुकानात प्रवेश केला.‎ दुकानातील डीव्हीआर, कॅमेरा, टीबी‎ हार्ड डिस्क, पितळी मटेरियल असा‎ ४५ हजारांच्या वस्तू चोरी केल्या.‎ अमोद वैशंपायन (रा. प्रणव बंगला,‎ संभाजी चौक) यांनी दिलेल्या‎ तक्रारीनुसार, कुटुंबियासोबत ते बाहेर‎ गेले असता बंगल्याच्या खिडकीचे‎ गज कापून घरात प्रवेश करत‎ कपाटातील दागिन्यांसह २ लाख ३५‎ हजारांचा एेवज चाेरी केला.‎

याप्रकरणी अनुक्रमे आडगाव,‎ म्हसरुळ आणि गंगापूर पोलिस‎ ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.‎ घरफोडी करणाऱ्यांकडून परिसरात‎ रेकी करुन बंद घरांना लक्ष्य केले जात‎ आहे. बंद घराच्या खिडकीचे गज‎ कापून अथवा दरवाजाचे कुलुप तोडून‎ घरफोडी केली जात आहे.‎ पोलिसांकडून गुन्हे दाखल केले जात‎ आहेत. मात्र उघडकीस येत नसल्याने‎ नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.‎

बातम्या आणखी आहेत...