आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराउद्याेजकांनी त्यांच्याकडे २०१९ पासून थकीत असलेला फायर सेसचा भरणा ३१ मार्चच्या आत करण्याबाबतच्या वसुलीच्या नाेटिसा एमआयडीसीने उद्याेजकांना बजावल्या आहेत. विशेष म्हणजे, उद्याेगमंत्री उदय सामंत व पालकमंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीत उद्याेजक संघटनांच्या बैठकीत अग्निशमन केंद्र महापालिकेकडे हस्तांतरित करण्याचे निश्चित झालेले असून १ एप्रिलपासून फायरसेस एमआयडीसीकडून वसूल केला जाणार नसल्याचे ठरलेले असतानाही तसा कुठलाच उल्लेख नाेटिसांवर नसल्याने उद्याेजकांमध्ये संभ्रमावस्था पाहायला मिळते आहे.
निमाकडून पाठपुरावा उद्याेगमंत्र्यांच्या बैठकीनंतरही जिल्हा उद्याेग मित्रची बैठक हाेऊ शकलेली नाही ही अत्यंत खेदजनक बाब मानली जात आहे. विशेष म्हणजे, उद्याेगमंत्री व पालकमंत्र्यांच्या बैठकीतील सूचनांनुसार निमाकडून मात्र सातत्याने वेगवेगळ्या विभागांकडे पाठपुरावा सुरू आहे. सरकारची दिशा व दशा दर्शविणारी असल्याचा आराेप उद्याेजक करू लागले आहेत.
प्रशासनच ढीम्म एका बाजूला उद्याेगमंत्री, पालकमंत्री थेट बैठका घेऊन निर्णय घेत असताना, प्रशासन मात्र ढिम्म आहे. कागदी घाेडे नाचवत असतील तर प्रश्न कसे सुटतील? - धनंजय बेळे, अध्यक्ष, निमा
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.