आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

झोपेतच काळाने केला घात:घराची भिंत पडून वंजारवाडीत पती-पत्नीचा मृत्यू, जोरदार पाऊसामुळे दुर्घटना

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक शहरापासून वीस ते पंचवीस किलोमीटर अंतरावर असलेल्या वंजारवाडी गावात गुरुवारी रात्री अति मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे एका घराची भिंत कोसळल्याने पहाटे तीन वाजेच्या सुमारास पती-पत्नीचा मृत्यू झाला.

वंजारवाडी येथे आठ दिवसांपूर्वी ढगफुटी सदस्य पाऊस होऊन दीडशे ते दोनशे हेक्टर जमीन वाहून गेली. ही घटना ताजी असतानाच पुन्हा गुरुवारी रात्री नाशिक शहरासह परिसरात अति जोरदार पाऊस झाला. वंजारवाडी येथेही सायंकाळपासून जोरदार पाऊस सुरू होता.

झोपेतच झाला मृत्यू

या पावसात लालवाडी परिसरातील छबु सिताराम गवारी यांच्या घराची पहाटे तीन वाजता अचानक भिंत कोसळली.यामध्ये छबु सिताराम गवारी (वय 42) आणि मंदाबाई छबु गवारी( वय 35) यांचा झोपेतच मृत्यू झाला. रात्री हा प्रकार लवकर लक्षात आला नाही.

शासनाला जाग येईल का?

सकाळी घडला प्रकार लक्षात आल्यानंतर स्थानिकांनी प्रशासनाला याबाबत माहिती दिली. आठ दिवसापूर्वी झालेल्या पावसाची पाहणी करण्यासाठी या परिसरात विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी भेट दिली होती. आता दोन जणांचा बळी गेल्यानंतर शासनाला जाग येते की नाही याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे. तसेच सिन्नर तालुक्यात दोन गावांमध्ये वीज पडून तीन गाईंचाही मृत्यू झाला आहे.

बातम्या आणखी आहेत...