आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संशयाचे भूत, जीवाचा खेळ!:आधी चिरला पत्नीचा गळा! नंतर इमारतीच्या तिसऱ्या मजल्याहून पतीने उडी घेत केली आत्महत्या!

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत पतीने कटरने पत्नीचा गळा चिरून तिच्या खुनाचा प्रयत्न केला. या प्रकाराने भेदरलेल्या पतीने इमारतीच्या तिसऱ्या मजल्याहून खाली उडी घेत आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार मंगळवारी (ता. 7) सायंकाळी 4 वाजता म्हसरुळ शिवारातील रामकृष्ण नगर येथे उघडकीस आला.

राजीव रतनसिंग ठाकुर (वय 50) असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी दिलेली माहिती अशी, रामकृष्ण नगर येथील लक्ष्मी रेसिडेन्सी या इमारतीमध्ये तिसऱ्या मजल्यावर राजीव ठाकुर हे पत्नी संध्या राजीव ठाकुर (वय 45) हे दोन मुलांसह वास्तव्यास राहत होते. सायंकाळी त्यांच्यात आणि पत्नीत वाद झाला. पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत तिला शिविगाळ करत मारहाणही केली.

कटरने चिरला गळा

पेपर कापण्याच्या कटरने त्याने पत्नीच्या गळ्यावर वार केला. गळ्याची नस कापल्याने रक्ताची चिळकांडी उडाल्यानंतर पत्नी जागेवर कोसळली. पत्नीचा खुुन केल्याने पतीने देवघराच्या गॅलरी मध्ये जाऊन खाली उडी घेतली. डोक्यास गंभीर मार लागल्याने पतीचा जागीच मृत्यू झाला.

इमारतीमधील नागरीकांना घटना समजताच त्यांनी ठाकुर कुटुंबियांच्या फ्लॅटकडे धाव घेतली. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या संध्या ठाकुर यांना तत्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल केले. प्रकृती गंभीर असल्याने त्यांना मेडीकल काॅलेज मध्ये दाखल करण्यात आले. म्हसरुळ पोलिस ठाण्यात मृत राजीव ठाकुर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते. उपआयुक्त अमोल तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरु आहे.

दाम्पत्याला दोन मोठे मुले

ठाकुर दाम्पत्याला 25 आणि 23 वर्षाचे दोन मुले आहे. ठाकुर हे पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत असल्याने दोघांमध्ये नेहमी वाद होत असत. यापुर्वी दोघांमध्ये वाद झाले होते. घटनेच्या वेळी दोन्ही मुले बाहेर गेल्याची संधी साधत पतीने पत्नीवर हल्ला करत जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. यानंतर स्वत: इमारतीहून उडी घेत आत्महत्या केली.

बातम्या आणखी आहेत...