आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापतीच्या विवाहबाह्य संबंधाचा जाब विचारण्याची मोठी किंमत एका विवाहितेला मोजावी लागली. संशयित पतीने पत्नीवर अनैसर्गिक अत्याचार करत तिचा शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी संशयित पतीविरोधात मुंबईनाका पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नीरज ललित नारंग (४६, रा. होलाराम कॉलनी) असे या संशयिताचे नाव आहे. याबाबत पीडितेने सोशल मीडियावर टाकलेल्या व्हिडिओ संदेशात याबाबत आपबिती कथन करत मदतीची याचना केली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती आणि पीडित विवाहितेने दिलेल्या तक्रारीनुसार, २००३ मध्ये लग्न झाले आहे. १० वर्षांचा मुलगा व ९ वर्षांची मुलगी आहे. २००० मध्ये पतीचे पहिले लग्न झाले होते. त्याने दुसरे लग्न पीडितेसोबत केले आहे. पतीचा लायटिंग वस्तू विक्रीचा व्यवसाय आहे. पतीचे लग्नापूर्वीपासून विवाहबाह्य संबंध असल्याचे २०१० साली समजले. तिच्यासोबत पती लिव इन रिलेशनशिपमध्ये राहतात. पतीचे इतर महिलांसोबत संबंध असल्याची माहिती मिळाली.
सासूला याबाबत कल्पना दिली मात्र त्यांनी शांत राहण्यास सांगितले. पतीला जाब विचारला तर बेदम मारहाण करत अनैसर्गिक अत्याचार केला. या प्रकाराचे मोबाइलमध्ये व्हिडिओ बनवत ते व्हायरल करण्याची धमकी दिली. चुलतसासऱ्यांनी पतीला समजावून सांगितले मात्र, पतीने त्यांना का सांगितले म्हणून गळा दाबून मारण्याचा प्रयत्न केला. फेब्रुवारीत पुन्हा मारहाण करत मुलांसह घराबाहेर हाकलून दिले. मुलांसह पीडित विवाहिता भाडेकरारावर रहात आहे. पती नांदवण्यास तयार नसल्याने दोन मुलांसह रस्त्यावर आल्याची भावना तिने साेशल मीडियावरील या व्हिडिओत व्यक्त केली. या प्रकाराने संबंधित महिला भयभीत झाली असून याबाबत मुंबईनाका पोलिसांनी योग्य तपास न केल्यास व संशयित पतीवर ठोस कारवाई न केल्यास गृहमंत्री व पोलिस आयुक्तांना भेटून व्यथा मांडणार असल्याचे तिने सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.