आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअन्न व्यावसायिकांमध्ये अन्नसुरक्षेच्या दृष्टीने जागरूकता निर्माण होण्यासाठी २०२१-२२ या वर्षात इट राइट इंडिया या चळवळीखाली हायजीन रेटिंग व इट राइट कॅम्पसचा उपक्रम राबविण्यात आला होता. उपक्रमात सहभागी झालेल्या अन्न व्यावसायिकांचा पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला.
अन्न व औषध प्रशासन विभागामार्फत व अन्नसुरक्षा व मानके प्राधिकरण नवी दिल्ली यांच्या सहयोगाने अन्नव्यवस्थेत बदल घडविण्यासाठी हायजीन रेटिंग व इट राइट कॅम्पस ही चळवळ राबविण्यात येत आहे. त्या अनुषंगाने राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते जिल्ह्यातील सहा कॅम्पसला इट राइट कॅम्पस आणि नऊ आस्थापनांना हायजीन रेटिंग प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले.
विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी डी. गंगाथरन, मनपा आयुक्त रमेश पवार, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, अन्न व औषध प्रशासनाचे सहआयुक्त चंद्रशेखर साळुंखे, सहायक आयुक्त विवेक पाटील उपस्थित होते. आस्थापनांची व कामगारांची वैयक्तिक स्वच्छता पिण्यायोग्य पाण्याची पूर्तता, कामगारांची नियमितपणे वैद्यकीय तपासणी व अन्न पदार्थांची गुणवत्ता यांना प्राधान्य देण्यात येत आहे.
त्यानुसार जिल्ह्यातील रेस्टॉरंट, कॅफेटेरिया, ढाबा, बेकरी, मिठाई दुकाने, किरकोळ विक्री करणारे चिकन व मटन आस्थापनांना तसेच शाळा-महाविद्यालय, विद्यापीठे, आस्थापना व रुग्णालयाच्या कॅम्पसमधून सुरक्षित व आरोग्यदायी अन्नपदार्थांना चालना देणाऱ्यांनाही प्रमाणपत्रे वाटप करण्यात आली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.