आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बनावट नोटांची छपाई:इडली डोसा विक्रेत्याने बनावट नोटा विक्रीचा थाटला नवा धंदा, संशयित अटकेत 5 लाखांच्या नोटा जप्त

नाशिक2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

लाॅकडाऊनमध्ये व्यावसाय बंद झाल्यानंतर आर्थिक चणचण होत असल्याने पत्नी मुलांनी पतीची साथ सोडली. पती बेरोजगार झाल्यानंतर चक्क बनावट नोटा विक्रीचा धंदा सुरु केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी मुंबईनाका पोलिसांनी संशयित इडली विक्रेत्याला बनावट नोटांसह अटक केली आहे. मलायारसन मदसमय (वय 33) रा. तामीळनाडू असे या संशयिताचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती आणि पोलिस कर्मचारी नाकोडे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, कालिका यात्रोत्सवात बनावट नोटा चलनात आल्याच्या तक्रारी पोलिसांत आल्या होत्या. पोलिसांकडून या संशयित व्यक्तीचा शोध सुरु होता. संशयित भारत नगर येथे राहत असल्याची माहिती मिळाली पथकाने संशयिताला सापळा रचून अटक केली. त्याच्याकडून 5 लाख 8 हजारांच्या पाचशे, शंभर, दोनशेच्या बनावट नोटा आणि खऱ्या चलनी 3 हजार 300 नोटा जप्त केल्या. वरिष्ठ निरिक्षक सुनिल रोहोकले यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

असा करत होता बनावट चलणी नोटांचा वापर

संशयित हा कालिका यात्रोत्सवात पाळणे, खाद्य पदार्थ, हाॅटेल, खेळण्याच्या वस्तू अाणि इतर साहित्य खरेदी करण्यासाठी पाचशे रुपयांच्या बनावट नोटा देत उर्वरि पैसे घेत तो बाजुला ठेवत होता.एक संशयित नकली नोटा देत असल्याच्या तक्रारी पोलिसांना प्राप्त झाल्या होत्या. या तक्रारीच्या अधारे पोलिसांनी परिसरातील सीसीटिव्ही बातमीदारांच्या माध्यमातून माग काढणे सुरु होते.

अलगद सापडला जाळ्यात

संशयित हा मुंबईनाका परिसरातील एका दुकानात फळे खरेदीसाठी गेला होता. त्याच्या वर्णनाच्या अधारे त्याला पथकाने ताब्यात घेत चौकशी केली. अंगझडतीमध्ये त्याकडे बनावट नोटा मिळून आल्या.

रोज पाचशे ते हजार रुपयांचा व्यवहार

कुणाला संशय येऊ नये म्हणून संशयित रोज फक्त पाचशे रुपयांच्या बनवाट नोटा चलनात आणून खऱ्या नोटा घेत होता. याच माध्यमातून यात्रोत्सवात लाखो बनावट रुपयांचा वापर केला.

इडली विक्री व्यावसाय बंद

संशयित हा पंचवटी काॅलेज परिसरात सकाळी इडली विक्री करत होता. कोरोना मध्ये व्यावसाय बंद झाल्यानंतर त्याची पत्नी मुले सोडून गेली. तो मदुराई ला गेला. येथे एका मित्राच्या मदतीने त्याने बनावट नोटा छापल्याची माहिती पोलिसांनी दिली.

'आयएसपी'मध्ये पडताळणी

बनावट नोटा इंडिया सिक्युरीटी प्रेस मध्ये पडताळीकरीता पाठविण्यात येणार आहे. किती बनावट चलण वापरात आणले याची चौकशी सुरु आहे, असे वरिष्ठ निरिक्षक सुनिल रोहोकले यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...