आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभिवादन:हिरावाडी कार्यालयात प्रतिमापूजन; डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या बलिदानामुळेच देश एकसंघ

नाशिकएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय जनसंघाचे संस्थापक डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्यासारखा देशासाठी बलिदान देणाऱ्या नेत्यांच्या विचारांवर काम करणारे आपण राजकीय कार्यकर्ते असून तेव्हाचा जनसंघ आणि आताचा भारतीय जनता पक्ष आणि एकसंघ देश त्यांच्या बलिदानावरच उभा असल्याचे व प्रतिपादन मंडल अध्यक्ष चंद्रशेखर पंचाक्षरी यांनी केले.

मुखर्जी यांच्या बलिदानदिनी हिरावाडीरोड येथील कार्यालयात पंचाक्षरी यांच्या हस्ते प्रतिमापूजन करून त्यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यात आले. डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी व पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी हिंदू महासभा व नंतर भारतीय जनसंघाच्या माध्यमातून कडाडून विरोध करत ‘एक देश मे दो विधान, दो प्रधान, दो निशान नहीं चलेंगे’असा नारा देत आंदोलन उभे केले. पारपत्र न घेता सर्वात पहिल्यांदा काश्मीरमध्ये प्रवेश केला. त्यांना अटक करण्यात आली. तुरुंगात त्यांचा गूढरित्या मृत्यू झाला.

या घटनाक्रमास उजाळा देण्यात आला. सरचिटणीस सोमनाथ बोडके यांनी मनोगत व्यक्त केले. दिगंबर धुमाळ, महेश महंकाळे, संजय संघवी, राहुल कुलकर्णी, वैशाली पंचाक्षरी, डॉ. मैथिली चव्हाण, किरण सोनवणे, सुरेश मकवाना आदी याप्रसंगी उपस्थित होते.