आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभारतातील पुरुषप्रधान संस्कृतीमुळे स्त्रीला कायम दुय्यम स्थान मिळत होते. मात्र आधुनिक युगात विद्यार्थिनींनी उच्च व आधुनिक शिक्षण आत्मसात केले तर त्यांना जीवनात यश हमखास मिळू शकते, असे प्रतिपादन पोलिस उपनिरीक्षक सविता उंडे यांनी केले. देवळाली कॅम्प येथील श्रीमती विमलाबेन खिमजी तेजुकाया महाविद्यालयात मंगळवारी (दि. २४) निर्भय कन्या अभियानाच्या उद्घाटनप्रसंगी उंडे बोलत होत्या. व्यासपीठावर प्राचार्य डॉ. एस. एस. काळे, पोलिस अधिकारी प्रशांत सांगळे, चंद्रकला कवटे, स्त्रीरोगतज्ज्ञ निवेदिता पवार, डॉ. मीनाक्षी गवळी, उपप्राचार्य डी. टी. जाधव, निर्मला मोराडे, उर्मिला गिते आदी होत्या. उंडे पुढे म्हणाल्या की, आधुनिक काळात मुली सर्वच क्षेत्रात आघाडीवर दिसतात. त्यामागे त्यांचे कष्ट अन मेहनत असून त्यामुळे भविष्यात महीला राज आलेले आपल्याला दिसेल.
प्राचार्य डॉ. एस. एस. काळे म्हणाले की, पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये महिलांची उपेक्षा केली जात होती. आज मात्र तसे चित्र नाही, आज पुरुषांच्या तुलनेत महिलाही पुढेच दिसत आहे. त्यांची गुणवत्ता त्या सिद्ध करतांना दिसत आहे. यावेळी द्वितीय सत्रात डॉ. मीनाक्षी गवळी यांनी विद्यार्थिनींना संरक्षणाचे धडे दिले, तिसऱ्या सत्रात डॉ. निवेदिता पवार यांनी स्त्री समस्या, आरोग्य व त्यांचे निराकरण याविषयी मार्गदर्शन केले. विद्यार्थी विकास अधिकारी सतीश कावळे, कार्यशाळा समन्वयक निर्मला मोराडे, डॉ. ऊर्मिला गिते, डॉ. गिते यांनी कार्यशाळा यशस्वितेसाठी परिश्रम घेतले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.