आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर कीटकजन्य आजारात वाढ होत असल्याचा पूर्वानुभव लक्षात घेत आयुक्त तथा प्रशासक रमेश पवार यांनी मोकळ्या भूखंडांसह बांधकाम प्रकल्पाच्या ठिकाणी डेंग्यू, चिकुनगुन्यासारख्या आजारांचा प्रसार करणाऱ्या डासांची उत्पत्तीस्थळे आढळल्यास प्रति स्पॉट दोनशे ते पाच हजारापर्यंत दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. हा दंड वसुलीचे अधिकार नगररचना विभागाला दिले जाणार असून त्यांनी बांधकाम परवानगी घेण्यापूर्वी तसेच बांधकाम पूर्णत्वाचा दाखला घेताना हा दंड वसुल करणे अपेक्षित आहे.
दरवर्षी पावसाळ्यात डेंग्यू, मलेरिया, चिकुनगुन्यासारख्या आजारांचा प्रादुर्भाव वाढतो. पावसाळ्यात पेस्ट कंट्रोल ठेकेदारामार्फत सूक्ष्मपणे औषध फवारणी होत नसल्यामुळेही साथरोग वाढतात, मात्र मलेरिया विभागाकडून काही वर्षांत ठेकेदाराकडे होणारे दुर्लक्षही संशयास्पद आहे. मोकळ्या भूखंडांवरच नागरिक कचरा टाकत असल्यामुळे रोगराई वाढत असून याबरोबरच शहरातील रस्ते तसेच अन्य खोलगट भागातही साठणाऱ्या पाण्यात डासोपत्ती होत आहे. या जागेशी संबंधित व्यक्तींना महापालिकेने नोटिसाही बजावल्यानंतर त्यांच्याकडून दाद मिळत नाही व पालिकाही नोटीस बजावून शांत बसण्यातच धन्यता मानत आहे. ही बाब लक्षात घेत मोकळे भूखंड व बांधकाम प्रकल्पांच्या ठिकाणी अस्वच्छता पसरवणारे व डासोपत्ती स्थळ आढळल्यास संबंधित जागामालक व बिल्डरांवर दंडात्मक कारवाईचा निर्णय झाला आहे.
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर कीटकजन्य आजारात वाढ होत असल्याने पालिकेने डासांची उत्पत्तीस्थाने आढळल्यास दंडात्मक कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. नागरिकांनी याची दखल घेणे गरजेचे आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.