आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इच्छुकावर टांगती तलवार:महापालिका निवडणुकीसाठी ओबीसी आरक्षण जाहीर झाल्यास 114 गटांमधील महिला आरक्षण बदलणार

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

महापालिका निवडणुकीसाठी ओबीसी आरक्षण कायम केल्यास 133 जागांपैकी अनुसूचित जाती-जमातीच्या 18 जागा वगळून उर्वरित 114 सर्वसाधारण गटांसाठी आरक्षण सोडत काढण्याची वेळ येणार आहे. तसे झाल्यास सर्वसाधारण गटांमधील सर्वच महिला आरक्षण बदलले जाणार असल्यामुळे उमेदवारांची अस्वस्थता वाढली आहे.

ओबीसींच्या राजकीय आरक्षणासंदर्भात दाखल दाव्यामध्ये सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यामुळे राज्यातील 18 महापालिकांच्या निवडणुका लांबणीवर पडल्या होत्या. नाशिक महापालिकेची निवडणूक 15 मार्चपूर्वी घेणे अपेक्षित होते. दरम्यान, 10 मार्च रोजीच सर्वोच्च न्यायालय संपूर्ण प्रक्रिया स्थगित केल्यामुळे इच्छुकांची निराशा झाली होती. दरम्यान , 4 मे रोजी सर्वोच्च न्यायालयाने राज्यातील 18 महापालिकांच्या निवडणुकाची प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश दिले.

ओबीसी आरक्षण वगळून निवडणुका होत असल्यामुळे राज्य सरकारने तातडीने ओबीसी समर्पित आयोगाच्या माध्यमांमधून आवश्यक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. हा डेटा साधारणपणे जून महिन्याच्या अखेरीस सर्वोच्च न्यायालयात सादर होण्याची शक्यता आहे. न्यायालयाने जर हा अहवाल स्वीकृत केला आणि महापालिका निवडणुकीसाठी ओबीसींच्या राजकीय आरक्षण कायम ठेवल्यास सर्वसाधारण गटातील 114 जागांची संपूर्ण आरक्षण सोडतीची प्रक्रिया नव्याने करावी लागेल, असे सूत्रांचे म्हणणे आहे.

तर 114 गटातील महिला आरक्षण बदलणार

नाशिक महापालिकेच्या 133 जागांपैकी अनुसूचित जाती प्रवर्गासाठी 19 तर अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी 10 जागा आरक्षित आहे. या व्यतिरिक्त 114 जागा सर्वसाधारण गटातील आहेत. पालिका निवडणुकीत ओबीसी आरक्षण कायम असते तर 114 मधील 38 ते 39 जागा ओबीसीसाठी आरक्षित करावे लागतील. आता नव्याने ओबीसी आरक्षण दिल्यास सर्वप्रथम 114 गटातील सर्वसाधारण महिला प्रवर्गाचे आरक्षण रद्द करावे लागेल. सर्वसाधारण गटातून प्रथम ओबीसी प्रवर्गासाठी आरक्षण काढावे लागेल. त्यानंतर ओबीसी व सर्वसाधारण जागांचा हिशोब करून त्या प्रमाणामध्ये महिला आरक्षण टाकावे लागेल. अशा परिस्थितीत यापूर्वी केलेले सर्वसाधारण गटातील महिला आरक्षण बदलले जाण्याची शक्यता आहे.

6 जूनपर्यंत हरकतीची मुदत सुरू

मंगळवारी अर्थातच 31 मे रोजी 133 जागांसाठी महिला राखीव व सर्वसाधारण गटाच्या आरक्षण सोडतीची प्रक्रिया पूर्ण झाली. या आरक्षण सोडतीवर 6 जून पर्यंत हरकत घेण्याची मुदत आहे. महापालिकेच्या राजीव गांधी भवन या मुख्यालयात सहाही विभागीय कार्यालयामध्ये हरकत घेण्याची सुविधा असल्याची माहिती उपायुक्त मनोज घोडे पाटील यांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...