आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पंचवटीत जनावर मालकावर गुन्हा दाखल:जनावरे मोकाट सोडाल तर आता पाेलिसांकडूनच गुन्हा दाखल

नाशिक2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मोकाट जनावरांपासून नागरिकांना होणारे धोके लक्षात घेता जनावरांना रस्त्यांवर सोडणाऱ्या मालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांकडून अशाप्रकारे पहिलाच गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पंचवटी पाेलिसांनी सांगितले. पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी शहरात पाहणी केल्यानंतर मोकाट जनावरांचा प्रश्न गंभीर असल्याचे लक्षात आले.

शहरात मोकाट जनावरे रस्त्यावर फिरत असल्याने वाहतूक कोंडी आणि अपघात हाेत आहेत. मालक जनावरांना चरण्यासाठी मोकाट सोडून देतात. अमृतधाम-तारवालानगर लिंकरोड ते मीनाताई ठाकरे स्टेडियमकडील रस्त्यावर जनावरे सोडणाऱ्या मालकावर वाहतुकीला अडथळा निर्माण होऊन नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण झाल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बातम्या आणखी आहेत...