आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Nashik
  • If The Phone Number Of Any Bank Branch Is Obtained From Google, Then The Phone Belongs To The Scoundrel; 15 Complaints Of Fraud Per Month |marathi News

दिव्य मराठी विशेष:कोणत्याही बँक शाखेचा फोन क्रमांक गुगलवरून मिळवला की फोन भामट्यांना लागतो; महिन्याला फसवणुकीच्या 15 तक्रारी

नाशिकएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • गुगल वरील बँकांच्या माहितीत फेरफार करत ग्राहकांची फसवणूक

गुगल सर्च इंजिन व मॅप्सवरील विविध बँकांच्या फाेन नंबरसह माहितीत फेरफार करून हॅकर्सकडून बँक ग्राहकांची आर्थिक फसवणूक करण्याचे प्रकार वाढले आहेत. शहरातील विविध पोलिस ठाण्यांसह सायबर सेलकडे यासंदर्भात फसणुकीचे महिन्याला १५ पेक्षा अधिक प्रकरणे दाखल होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. कोणत्याही बँकेच्या शाखेचा संपर्क क्रमांक गुगलवरून मिळवला की प्रत्यक्षात तो क्रमांक भामट्यांना लागतो. त्यानंतर तो ग्राहकांची संपूर्ण माहिती घेत लाखोंची फसवणूक करत असल्याचे प्रकार उघडकीस येत आहे.

ऑनलाइन बँकिंग सुरक्षित असल्याचे सांगितले जात असले तरी ऑनलाइन फसवणुकीची अनेक प्रकरणे समोर येत आहे. त्यातच आता गुगल मॅप्सच्या माध्यमातूनही बँक ग्राहकांची फसवणूक होत असल्याचे समोर आले आहे. गुगलच्या काही त्रुटींचा फायदा घेत भामट्यांकडून बँक ग्राहकांची फसवणूक केली जात असल्याचे तज्ञांचे म्हणणे आहे. गुगल सर्च आणि गुगल मॅप्सवर दिलेल्या माहितीमुळे बँक ग्राहकांची फसवणूक होणे ही बाब धक्कादायक आहे. डिजिटल इंडियाच्या नावाने मोबाइल, ऑनलाइन बँकिंगचा गाजावाजा करणाऱ्या बँका अपडेट नसल्याने दररोज ग्राहकांची फसणूक होत असल्याचे चित्र आहे. भामट्यांकडून थेट गुगल सर्च इंजिनवरील बँकेचा फोन नंबर बदलत दिशाभूल करून भामटे स्वत:चा नंबर त्यावर टाकत ग्राहकाशी संवाद साधत त्याच्या बँक खात्याची माहिती घेत फसणूक करत असल्याचे चित्र आहे.

फोन नंबरमध्ये बदल करत फसवणूक
बँक ऑफ इंडिया, आयसीआयसीआय, एचडीएफसी, अॅक्सिस बँक, बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक, कॅनरा बँक यांच्यासह जवळपास सर्व नामवंत बँकांच्या गुगलवरील संकेतस्थळांवर फेरफार करून फोन नंबरमध्ये बदल करून स्वत:चा नंबर टाकत नागरिकांची फसवणूक भामट्यांकडून केली जात असल्याचे समोर आले आहे. स्टेट बँकेच्या संकेतस्थळाद्वारे सर्वाधिक फसवणुकीचे प्रकार घडत असल्याचे चित्र आहे.

अचूकतेचा उद्देश, फसवणुकीचा मार्ग
अचूकता यावी या उद्देशाने गुगलने ‘सजेस्ट अ‍ॅण्ड एडिट’चा पर्याय वापरकर्त्यांना दिला आहे. याद्वारे बँक, वित्तीय संस्था, विविध सेवा पुरवठादारांचे ग्राहक सेवा केंद्र, शासकीय किंवा खासगी आस्थापनांचे तपशील जसे पता, संपर्क क्रमांक बदलणे शक्य आहे. हा पर्याय वापरून भामटे मूळ संपर्क क्रमांक खोडून स्वत:चा क्रमांक जोडतात. ग्राहक हा क्रमांक संबंधित बँक, वित्तीय संस्था वा इतर सेवांचा समजून बोलतात. भामट्यांच्या भूलथापांमध्ये गुंतून माहिती पुरवतात व फसतात.

बँकेच्या अधिकृत वेबसाइटचाच वापर करा

सायबर क्राइम करणाऱ्यांकडून ग्राहकांची फसवणूक करण्यासाठी बॅँकांच्या वेबसाइटचाही वापर केला जात असल्याचे समोर येत आहे. बॅँकेची वेबसाइट वापरताना किंवा त्याची माहिती घेताना अधिकृत वेबसाइट तपासून घेणे गरजेचे आहे. वेबसाइट बघितल्यानंतर अशा भामट्यांचे फोन येत आहे. नागरिकांनी कोणाला ही ओटीपी देऊ नये तसेच, ऑनलाइन व्यवहार करताना सतर्कता बाळगावी. - सूरज बिजली, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, सायबर सेल