आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Nashik
  • If The Progress Of The Country Is To Be Achieved, It Is Necessary To Take Care Of The Health Of The Country First; Dr. Assertion By Anil Jaishi| Marathi News

प्रतिपादन:देशाची प्रगती साधायची असल्यास आधी देशाच्या प्रकृतीची काळजी घेणे आवश्यक; डाॅ. अनिल जाेशी यांचे प्रतिपादन

नाशिक2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

विविध क्षेत्रांत देशाची प्रगती साधायची असल्यास आपल्याला आधी देशाच्या प्रकृतीची काळजी घेणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन पद्मश्री आणि पद्मभूषण प्राप्त डॉ. अनिल जोशी यांनी केले. पंचवटीतील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयात गुरुवारी (दि. ६) ‘प्रगति से प्रकृति पथयात्रा’ या अंतर्गत आयाेजित व्याख्यानात डाॅ. जाेशी बाेलत हाेते. व्यासपीठावर संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. हरिष आडके, आदिवासी सेवा समितीचे संयुक्त सचिव राजेश शिंदे, प्राचार्य डॉ. राजेंद्र भांबर, उपप्राचार्य डॉ. जितेंद्र नेहते, उपप्राचार्य डॉ. अंबादास रोटे, पर्यवेक्षक डॉ. आशिष पवार आदी उपस्थित होते.

​​​​​व्याख्यानात डॉ. जोशी पुढे म्हणाले की, स्वतःची ओळख, भाषा यांचा विसर पडू देऊ नका. आपली भाषा महत्त्वाची आहे, ती टिकवून ठेवणे हे आपल्याच हाती आहे. आपण पर्यावरणास हानी पोहाेचवत आहोत. आपल्या नदीला माई किंवा आई म्हणतो, पण तिचा सांभाळ नीटपणे करू शकत नाही. आपण वृक्षतोड करतो, यामुळे आरामासाठी वृक्षाची सावलीसुद्धा मिळत नाही हे किती दुर्दैव आहे.

आपण आपली संस्कृती विसरून चालणार नाही, हाच संदेश देण्यासाठी मी देशभरात फिरत असतो. आजच्या तरुण पिढीने हे ठरविले तर निश्चितच प्रकृतीबाबत विचारपूर्वक उपक्रम राबवून तिचे वैभव टिकवून ठेऊ शकताे. पूर्ण प्रगतीने प्रकृतीचा बळी चढवला आहे. प्रकृती आणि प्रमू याच्यात काेणतेही अंतर नाही, हे लक्षात घ्यावे. पर्यावरणावर हाेणाऱ्या विपरीत परिणामाचा विचार करून युवावर्गाने मनात धोक्याची घंटा वाजू द्यावी, असे आवाहनही त्यांनी केले. सूत्रसंचालन प्रा शुभांगी पवार यांनी केले. आभारप्रदर्शन डॉ. महालक्ष्मी यांनी केले. यावेळी विद्यार्थी उपस्थित हाेते.

बातम्या आणखी आहेत...