आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाेलिसांबद्दल नाराजी:शहरात अमली प्रदार्थांची विक्री न थांबल्यास विधानसभेत प्रश्न मांडू

नाशिक2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरात मोठ्या प्रमाणावर अंमली पदार्थांची विक्री होत असल्याची बाब निदर्शनास येत असून भिवंडी येथून नाशिक शहर व मालेगावात अमली पदार्थांची तस्करी होत आहे. तसेच नाशिक शहरात हुक्का पार्लर देखील मोठ्या प्रमाणावर सुरू असून त्याच्यावर देखील कायदेशीर कारवाई करण्याची मागणी आमदार देवयानी फरांदे यांनी पत्रकार परिषदेत केली.

मखमलाबाद रस्ता व गंगापूर रोडवर काही ठिकाणे अमली पदार्थांचे अड्डे झालेे आहे. पान टपरीवर अमली पदार्थ रात्री दाेनपर्यंत मिळतात, असे नमूद करताना आमदार फरांदे यांनी याबाबत पाेलिस आयुक्त यांच्याकडे वारंवार तक्रार केली असताना कारवाई झाली नसल्याचे सांगितले. मुंबई नाका परिसरातही अवैध व्यवसाय सुरू आहे. या सर्व प्रकारामुळे नाशिक बदनाम हाेत असल्याचे आमदार फरांदे म्हणाल्या.

भिवंडी येथून होणारी अमली पदार्थांची वाहतूक थांबविणे तसेच हुक्का पार्लरवर कारवाई झाली नाही तर हिवाळी अधिवेशनात विधानभवनात याप्रकरणी प्रश्न उपस्थित करणार असल्याचा इशारा आमदार देवयांनी फरांदे यांनी दिला. शहरात माेठ्या प्रमाणात अवैध व्यवसाय वाढले असल्याबाबत नागरिकांनी देखील आपल्याकडे तक्रारी केल्या. त्यांनतर तातडीने पाेलिस आयुक्तांशी चर्चाही केली. लवकरात लवकर हा प्रश्न निकाली निघ‌ावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

बातम्या आणखी आहेत...