आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुस्तक प्रकाशन:घरात आजी-आजोबा नसले तर पुस्तकांचे संस्कार तरी हवे ; प्रा. डॉ. मोगल यांचा संवाद

नाशिक4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रत्येकावर लहान वयापासून संस्कार हवे अन्‌ संस्कारासाठी घरात आजी-आजोबा असले पाहिजे. परंतु, आजी-आजोबा घरात नसेल तर किमान पुस्तकांचे संस्कार गरजेचे आहे. तेव्हाच डोक्याने शास्त्रज्ञ आणि हृदयाने संत निर्माण होतील, असे प्रतिपादन प्रसिद्ध कवी प्रा. डॉ. गणेश मोगल यांनी केले.

उषा महाजन लिखित ‘प्रश्‍न मनातील उत्तर विज्ञानातील’ व ‘क्वेशन्स इन माइंड ॲन्सर इन सायन्स’ या पुस्तकांच्या प्रकाशन समारंभात ते बोलत होते. अक्षरबंध प्रकाशनाने ही दोन्ही पुस्तके प्रकाशित केली आहेत. जऊळके येथील ज्येष्ठ नागरिक संघाच्या सभागृहात झालेल्या समारंभात मातोश्री इंजिनिअरिंग कॉलेजचे टीपीओ प्रा. डॉ. नीलेश घुगे अध्यक्षस्थानी होते. प्रमुख पाहुणे जऊळकेच्या सरपंच भारती जोंधळे व युनिक ॲग्रिकल्चरचे संचालक नितीन बावके उपस्थित होते. अनुष्का घुगे, अथर्व जोंधळे, अनुष्का माळी, अनुष्का घुगे यांनी परिचय करून दिला. छोटी दुर्वा महाजन हिने पुस्तकाविषयी माहिती दिली. प्रा. डॉ. नीलेश घुगे, भारती जोंधळे व नितीन बावके यांनी विचार मांडले. चारुशीला माळी यांनी प्रास्ताविक तर प्रीती जोंधळे यांनी आभार मानले.

किशोरी बावके यांनी सूत्रसंचालन केले. प्रकाशक-संपादक प्रवीण जोंधळे, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष दत्तात्रेय जाधव, वैष्णवी माळी, कल्याणी बागडे, सुवर्णा घुगे, दीपाली मोगल, गायत्री बर्वे, ज्येष्ठ नागरिक संघाच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले. प्रतिष्ठानतर्फे कला अध्यापक भा. वा. जाधव, योगप्रशिक्षिका नूतन गायकवाड, अभिनेत्री श्रुती भावसार, अवंतिका गांगुर्डे, कराटे प्रशिक्षक मोशीम मणियार यांना गाैरविण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...